‘गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज’ म्हणजे काय ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

 

गर्ड (GERD – Gastroesophageal Reflux Disease) म्हणजे काय ?

जीईआरडी यालाच गर्ड म्हणतात किंवा अन्न नलिकेतील आम्ल उलटण्याचा आजार असं म्हटलं जातं. ही एक अशी स्थिती आहे ज्यात अन्न नलिकेच्या (इसोफॅगस) शेवटी असणारा वर्तुळाकार स्नायू नीट बंद होत नाही. त्यामुळं पोटातील घटक पुन्हा अन्न नलिकेत वर जातात. यामुळं अस्वस्थ वाटू लागतं. हे हृदयातील जळजळी सारखं असतं. यात जर आठवड्यातून दोनदा हृदयात जळजळ होत असेल तर त्याला जीईआरडी आहे असं म्हणतात.

काय आहेत याची लक्षणं ?

– आठवड्यातून दोनदा हृदयात जळजळ होणं हे याचं प्रमुख लक्षण आहे.
– छातीच्या मध्यभागात जळजळ
– उचक्या लागणं
– घशात जळजळ होणं
– गिळताना त्रास होणं
– श्वासांची दुर्गंधी
– सारखंच पोट भरल्यासारखं वाटणं
– खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटणं
– आंबट तोंड
– खाल्ल्यानंतर छातीत दुखणं
– पोटातील आम्ल तोंडात येऊन वाईट चव येणं

काय आहेत याची कारणं ?

– लठ्ठपणा
– कॉफी व दारू सारख्या पदार्थांचं सेवन
– गर्भधारणा
– चरबीयुक्त पदार्थांचा आहार
– तणाव
– हर्निया (पोटाच्या वरील भाग छातीकडे सरकू लागतो)
– धूम्रपान
– पेन किलरच्या गोळ्यांचं सेवन
– मसालेदार पदार्थ खाणे

काय आहेत यावरील उपचार ?

– जळजळ होणारे अन्नपदार्थ टाळणं
– वजन कमी करणं
– अशा भागात झोपणं ज्यात शरीराच्या वरचा भाग वर राहिल.
– कमी खा
– मन शांत ठेवायचा प्रयत्न करा.
– धूम्रापन, कॉफी व दारू वर्ज्य करा.
– अनेकदा हृदयातील जळजळीसाठी औषधंही दिली जातात.
– काही गंभीर प्रकरणात स्नायू पक्का होण्यासाठी शस्त्रक्रियेचा उपाय सुचवला जातो.