जर्मनी-फ्रान्स एकत्र येऊ शकतात, मग भारत-पाकिस्तान का नाही’: इम्रान खान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असा सवाल पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी उपस्थित केला आहे. नुकतेच कतारपूर कॉरिडोरचे भूमीपूजन  इम्रान खान यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताकडे मित्रत्वाच्या नात्याने पाहिलं आहे. यावरूनच दिसत आहे की, इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाबाबत सकारात्मक विधान केलं आहे.
आज पाकिस्तानच्या कतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकशी जोडण्यात येणारे पहिले पाऊल पडल्याचे दिसून आले. शिख गुरूंनी 1522 मध्ये या गुरूद्वाराची स्थापना केली होती. पहिला गुरुद्वारा, गुरुद्वारा कतारपूर साहिब येथे उभारण्यात आला होता. येथेच गुरू नानक यांनीही आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण व्यतीत केले होते. पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा नानक शाहपासून करतारपूरपर्यंत कॉरिडॉर बांधण्याची मागणी शीख समुदायाकडून बऱ्याच कालावधीपासून होत होती. याबाबत, भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारनेही भारताच्या या भूमिकेचं स्वागत केल्याचं दिसून आलं. पाकिस्तानमध्ये कतारपूर साहिब हे प्रार्थनास्थळ रावी नदीपलिकडील डेरा बाबा नानक यांच्यापासून केवळ 4 किमी अंतरावर आहे.
“भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्दा आहे. जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात मग भारत-पाकिस्तान का एकत्र येऊ शकत नाही ? असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला. कर्तारपूर मार्गिका खुली झाल्यास दोन्ही देशांमध्ये गरीबी दूर होण्यास मदत होईल असे इम्रान म्हणाले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना युद्धा करायचे नाही मग मैत्री शिवाय दुसरा कुठला मार्ग उरतो” असे इम्रान खान म्हणाले.
इतकेच नाही तर “मदीनापासून चार किलोमीटर अंतरावर असूनही काही मुस्लिमांना दर्शनासाठी जात येत नाही. पण जेव्हा त्यांना दर्शनाची संधी मिळते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो. तसाच आनंद मला आज कर्तारपूर साहिब मार्गिकेच्या निमित्ताने दिसत आहे” असे इम्रान खान म्हणाले.
तर दुसरीकडे या कार्यक्रमात बोलताना हिंदू जीवे, पाकिस्तान जीवे अशी घोषणा भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. “मला अजिबात भिती नाही, मेरा यार इम्रान जीवे. सर्वांनी आपली विचार करण्याची पद्धत बदलायला हवी. तरच शांती प्रस्थापित होईल, आता मारा-मारी, रक्तसंग्राम बंद व्हायला हवा. तरच, मैत्रीचा धागा विनला जाईल” असेही सिद्धू यांनी म्हटले.

https://twitter.com/ANI/status/1067730745907650565

https://twitter.com/ANI/status/1067731505860902912