Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  तुम्हाला घरून काम करण्याची (Work From Home) मुभा असेल तुम्ही अशा एखाद्या नोकरीच्या शोधात आहेत का?, घरबसल्या तुम्हाला पैसे कमवायचे आहेत का? अशा पाच कामांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या द्वारे तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता; मात्र यासाठी काही खास कौशल्ये असणे आवश्यक आहे.

डिजिटल मार्केटिंग : (Digital Marketing)

हा सध्या सर्वाधिक लोकप्रिय आणि मागणी असलेला व्यवसाय आहे. स्टार्टअप्ससाठी (Startups) मार्केटिंग करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण मार्केटिंगच्या साहाय्यानंच ते आपला व्यवसाय वाढवू शकतात. त्यामुळं स्टार्टअप्स डिजिटल मार्केटिंगचा (Digital Marketing) पर्याय स्वीकारत आहेत. डिजिटल मार्केटिंगच्या आधारे सोशल मीडियावर ते आपला व्यवसाय वाढवू शकतात. ग्लासडोरच्या अहवालानुसार, भारतात एका फ्रीलान्स डिजिटल मार्केटरचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५ लाख ७४ हजार १५२ रुपये ते ९ लाख ५९ हजार ३५३ रुपयांपर्यंत असू शकते.

डिजिटल मार्केटिंगसाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे ?

– या लोकांना शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) (SEO) आणि सर्च इंजिन मार्केटिंग (एसईएम) (SEM) यांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

– या व्यतिरिक्त व्हिडिओ तयार करणे आणि व्हिडिओ मार्केटिंग याबद्दल देखील माहीत असणं आवश्यक आहे.

– विश्लेषक साधने जसे की, गुगल अ‍ॅनालिटिक्स, एमएझेड प्रो इत्यादीबाबत माहिती असावी.

– या साधनांचा उपयोग वेबसाइट ट्रॅफिक आणि कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी केला जातो.

वेब डेव्हलपर : (Web Developer)

वेब डेव्हलपिंगलाही (Web Developing) सध्या मोठी मागणी असून वेब डेव्हलपर्सची वेगवेगळ्या क्षेत्रात गरज भासते. प्रत्येक स्टार्टअपला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एका आकर्षक वेबसाइटची गरज असते. वेबसाइट बनविण्यासाठी कोडींग आणि वेब डिझायनिंगची आवश्यकता असते.

वेब डेव्हलपरकडे कोणती कौशल्ये असली पाहिजेत?

– टेस्टिंग आणि डीबगिंगचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

– डिझायनिंगचा अनुभव असावा.

– याशिवाय यूआय (यूजर इंटरफेस) आणि यूएक्सचे ज्ञान असले पाहिजे.

– बॅक-एंड डेव्हलपमेंटही अवगत असणं आवश्यक आहे.

कन्टेन्ट रायटिंग : (Content Writing)

हा एक आवडीतून सुरू होणारा व्यवसाय आहे. अनेक लोक आपल्या आवडत्या विषयावर लिखाण करत असतात. ते स्वतःच्या नावानं एखादा ब्लॉग (Blog) करून ते मांडत असतात. त्यांना ब्लॉगर (Blogger) म्हणतात. अनेक लोक पूर्णवेळ ब्लॉगर म्हणून काम करतात. ब्लॉग सुरू करण्याचे दोन प्रकार आहेत. वर्डप्रेस किंवा टंबलरच्या मदतीनं ब्लॉग सुरू करता येतो. यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. ब्लॉगवरील कंटेंटनुसार जाहिराती मिळतात. त्यातून तुम्हाला चांगली कमाई होते. कंटेंट लिहून देण्याच्या कामातूनही चांगले पैसे कमावता येतात.

ग्राफिक डिझायनिंग : (Graphic Designer)

तुम्हाला अ‍ॅडोब क्रिएटीव्ह क्लाउड किंवा फोटोशॉप यासारख्या कोणत्याही ग्राफिक डिझाइन सॉफ़्टवेअरचं उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही कंपन्यांसाठी ग्राफिक डिझाइन (Graphic Designer) करून चांगली कमाई करू शकता. यासाठी आपल्याकडं क्रिएटीव्हीटी असणं आवश्यक आहे. पेस्केलच्या (Pay Scale) अहवालानुसार, भारतात एका मुक्त ग्राफिक डिझायनरला दर तासाला सरासरी 295 रुपये मिळतात, तर ग्लासडोरच्या मते ग्राफिक डिझायनरची वार्षिक कमाई सरासरी ५ लाख २१ हजार ५०५ रुपये आहे.

ब्लॉकचेन डेव्हलपर : (Block Chain Developer)

ब्लॉकचेन डेव्हलपर (Block Chain Developer) एक नवं क्षेत्र आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, रिटेल या सर्वच क्षेत्रात ब्लॉकचेन डेव्हलपरची गरज भासते. ब्लॉकचेन डेव्हलपर्सची मागणी वेगानं वाढत असून, त्या तुलनेत उपलब्धता कमी असल्यानं त्यांना कंपन्या भरपूर पैसा देण्यास तयार आहेत.