रेल्वे प्रवाशाना दिलासा ! तिकिटावर मिळणार 10 % डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  रेल्व प्रवाशांना तिकिटाबद्दल एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ते म्हणजे प्रवाशांना आता रेल्वेकडून एक दिलासदायक बातमी मिळाली आहे की, रेल्वेचे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचे प्रत्येक तिकीट बुकिंगवर आता १० टक्के सूट देण्यात येणार आहे. ही सुविधा सर्व स्पेशल ट्रेन साठी उपलब्ध असणार आहे. सीटिंग चार्ट तयार झाल्यानंतर आणि बर्थ मध्ये काही जागा शिल्लक असल्यास प्रत्येक तिकीट बुकिंगवर प्रवाशांना १० टक्के डिस्काउंट मिळू शकेल. यासाठी एकच अट असणार आहे की, तुम्हाला रेल्वे निघण्याअगोदर अर्धा तास अगोदर तिकीट बुकिंग करता येणार आहे. प्रवासी काउंटरवरून किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुकिंग करू शकतो.

गोरखपुर अहमदाबाद-मुंबई आणि सिंकदराबाद या मार्गे धावणाऱ्या रेल्वेसाठी सध्या कन्फर्म तिकीट उपलब्ध नाही तसेच प्रवासी उपलब्ध नसल्याने अनेक रेल्वे अन्य मार्गाने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच अनेक रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. आनंद विहार टर्मिनल, मुजफ्फरनगर-आनंद विहार टर्मिनल, नवी दिल्ली, वाराणसी ,नवी दिल्लीला गोरखपुरमार्गे जाणाऱ्या स्पेशल ट्रेन रद्द करण्यात आले आहेत. प्रवाशांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सांगितले.

तिकीट बुकिंग केल्यास कशी सूट मिळू शकते?

प्रवाशाने रेल्वे निघण्याआधी अर्ध्या तासापूर्वी तिकीट बुकिंग केली असल्यास २७६० रुपयाचं एसी तिकीट २५०० रुपयांना मिळेल. एसी टायर टूचे तिकीट १६४५ रुपये असल्यास ते तुम्हाला १४९० रुपयांना मिळेल. तसेच एसी थर्ड चे तिकीट ११६५ रुपयांना असल्यास ते १०६० रुपयांना मिळेल. स्लीपर क्लासचे तिकीट ४४५ रुपये असल्यास तो ४०५ रुपयांना बुक करता येईल. सामान्य कक्षातील २६० रुपयांचे तिकीट २४० रुपयांना मिळेल.