मोदी सरकारची खास स्कीम ! आता फक्त 342 रूपयांमध्ये मिळणार ‘ट्रिपल’ विम्याचं ‘कव्हर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला केवळ दुहेरी नव्हे तर तिहेरी विमा संरक्षण मिळेल. हे दोन्ही विमा संरक्षण अपघाती मृत्यू (Accidental Death Cover), अपंगत्व (Disability Cover) आणि जीवन संरक्षण (Life Cover) साठी असेल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत तुम्हाला अपघाती मृत्यू व अपंगत्व संरक्षण मिळेल, त्यासाठी तुम्हाला 12 रुपये खर्च करावे लागतील. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत तुम्हाला एकूण 330 रुपये खर्च करावे लागतील. अशा प्रकारे, वर्षामध्ये एकदा 342 रुपये प्रीमियम जमा करून आपण एकूण 3 विमा संरक्षण मिळवू शकता.

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना –

मोदी सरकारच्या या योजनेत 18 वर्षे ते 70 वर्षे वयोगटातील लोकांना अपघाती मृत्यू विमा आणि अपंगत्व विमा संरक्षण मिळेल. यामध्ये कोणत्याही अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास हा दावा केला जाऊ शकतो. मात्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी ही योजना लागू नाही. अपघाती मृत्यूसाठी 2 लाख तर अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांसाठी हा दावा केला जाऊ शकतो.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना –

या विमा योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. तेथे 2 लाख रुपयांचे जीवन संरक्षण (Life Cover) मिळेल. वर्षाच्या मध्यात या योजनेसाठी अर्ज केल्यावर, प्रीमियम अर्जाच्या तारखेच्या आधारे निश्चित केला जाईल.

– पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत जून, जुलै आणि ऑगस्टचे वार्षिक प्रीमियम 330 रुपये द्यावे लागेल.

– सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठी वार्षिक प्रीमियम 258 रुपये भरावा लागेल.

– डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठी प्रीमियम 172 रुपये असेल आणि मार्च, एप्रिल आणि मे साठी त्याला वार्षिक 86 रुपये द्यावे लागतील.

– यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन घेऊ शकता.

– आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी एलआयसी किंवा इतर विमा कंपनीसाठी अर्ज करू शकता.

Visit : Policenama.com