गॅस सिलेंडर बुक करा अन् 500 रुपयांपर्यंतचा Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ही ऑफर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशात घरगुती गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) वापर शहरांपासून गावखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकारने अलीकडेच एलपीजी गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करून ग्राहकांचा खिशा कापला आहे. ज्यानंतर विना-सबसिडीचा 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर 644 रुपयांवरून 694 रुपयांना मिळत आहे. चालू डिसेंबर महिन्यात सिलेंडरच्या किंमतीमध्ये दोन वेळा वाढ झाली आहे. मात्र या महागाईच्या काळातही तुम्ही सिलेंडर केवळ जवळपास 200 रुपयांनी मिळवू शकता. जाणून घ्या कशी मिळवाल ही ऑफर

तुम्ही पेटीएम (Paytm) वर एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगवर (LPG cylinder) 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच पेटीएमद्वारे गॅस सिलेंडर बुक करणा-यांना दिला जाणार आहे. देशातील अधिकांश भागामध्ये साधारण 700 ते 750 रुपये या दराने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री केली जात आहे. अशावेळी या ऑफरचा फायदा घेत तुम्ही केवळ 200 ते 250 रुपयांपर्यंत HP, Indane, Bharat Gas एलपीजी सिलेंडर मिळवू शकता.

Paytm वरून कसा कराल LPG सिलेंडर बुक ?

-सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Paytm app डाऊनलोड करावे लागले. अ‍ॅप उघडल्यानंतर ‘recharge and pay bills’वर क्लिक करावे लागणार आहे.

-याठिकाणी भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर प्रोव्हायडर निवडावा लागेल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून तुमचा LPG ID दाखल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. याठिकाणी पेमेंट करण्याआधी ‘FIRSTLPG’ हा प्रोमो कोड वापरावा.

कधीपर्यंत आहे ही ऑफर?
हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पेटीएमवरून पहिल्यांदा बुकिंग करणारे ग्राहकच 500 रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर मिळवू शकतात. Paytm LPG Cylinder Booking Cashback Offer या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत घेता येईल. अर्थात स्वस्तात सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 2 दिवस शिल्लक आहेत.