99 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळत आहेत बऱ्याच सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणत असतात. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल आपल्या प्रीपेड ग्राहकांना बरेच प्लॅन ऑफर करत असतात. ग्राहक त्यांच्या आवडीचा आणि सोयीचा प्लॅन निवडू शकतात. अलीकडे या तिन्ही कंपन्यांनी काही नवीन प्लॅन आणले आहेत. आज आपण एअरटेल, रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलच्या नवीनतम योजनांबद्दल जाणून घेऊया.

एअरटेलचे प्लॅन

एअरटेलने तीन नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. त्यांची किंमत 99 रुपये, 129 आणि 199 रुपये आहे. 99 रुपयांच्या प्लॅनची वैधता 18 दिवसांची आहे. यात 1 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसाची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये देखील 1 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह 300 एसएमएस मिळतात.

त्याचप्रमाणे कंपनीच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांसाठी दररोज 1 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. यात युजर्सना दररोज 100 एसएमएस मिळतात. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये Zee5, विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीमचे मोफत सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्सचे प्लॅन

जिओने दररोज 2 जीबी डेटासह दोन नवीन प्लॅन आणले आहेत. त्यांची किंमत 2399 आणि 2599 रुपये आहे. दोन्ही योजनांची वैधता 365 दिवस आहे. फरक इतकाच आहे की 2599 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चे व्हीआयपी सबस्क्रिप्शन येते. या दोन्ही प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अमर्यादित कॉलिंग मिळते. तसेच अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 12,000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

बीएसएनएलचे नवीन प्लॅन

सरकारी कंपनी बीएसएनएलने दोन नवीन प्लॅन आणले आहेत. त्यांची किंमत 365 आणि 2,399 रुपये आहे. 365 रुपयांचा प्लॅन केवळ 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. तथापि, या सुविधांचा लाभ केवळ 60 दिवसांसाठी मिळतो. याशिवाय कंपनीच्या 2399 रुपयांच्या योजनेत अमर्यादित कॉलिंग केवळ 600 दिवसांसाठी उपलब्ध आहे.