‘Airtel digital TV’ 6 महिन्यांसाठी ‘फ्री’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – DTH ऑपरेटर यूजर्सला सध्या नवनव्या ऑफर्स देत आहे. एअरटेल देखील आपल्या ग्राहकांना विविध ऑफर देत आहे. त्यात कंपनी आपल्या ग्राहकांना सेटटॉप बॉक्स अपग्रेड करण्याची ऑफर देत आहे. परंतू ग्राहकांना माहित नाही की एअरटेल डिजिटल टीव्हीवर 6 महिन्यांची मोफत सेवा मिळवू शकते. ही ऑफर त्यांच्यासाठी असणार आहे जे नवीन LG टीव्ही खरेदी करतील किंवा ज्यांच्याकडे नवा LG टीव्ही आहे. कारण एअरटेल डिजिटल टीव्हीने एलजी टीव्हीवर ऑफर दिली आहे.

या ऑफरमध्ये ग्राहकांना व्हॅल्यू लाइट एचडी पॅक बरोबर 6 महिन्याचा दबंग स्पोर्ट्स पॅक मिळेल. ज्याची किंमत 2500 रुपये असेल परंतू ग्राहक या ऑफरशिवाय इतर चॅनलचे पॅकचा कॉम्बिनेशन देखील घेऊ शकतात असे केल्यास ग्राहकांना 3,499 रुपयांचा खर्च येईल. म्हणजेच जर ग्राहकांनी LG TV खरेदी केला असेल तर त्यांना ऑफर म्हणून हा पॅक 1,499 रुपयांना मिळेल. या अ‍ॅक्सेसरीज म्हणून बॉक्स बरोबरच ODU, 10m वायर, अ‍ॅक्टिवेशनल कॉस्ट, रिमोट आणि अ‍ॅडाप्टर असेल. एअरटेल डिजिटल टीव्हीची ही ऑफर फक्त LG TV मॉडेल्सवर आहे, जे 2017 – 2019 दरम्यान लॉन्च झाले होते.

कशी मिळेल सुविधा
ही सुविधा मिळण्यासाठी एअरटेलने वेबसाइटवर प्रक्रिया दिली आहे. सर्वात आधी तुम्हाला एअरटेलच्या डीटीएच नंबर 8130481306 वर कॉल करावा लागेल. त्यानंतर एग्जिक्यूटिवला आपला एलजी टीव्हीचा सिरिअल नंबर सांगावा लागेल. व्हेरिफिकेशननंतर तुम्ही या डिस्काऊंटसाठी इलिजिबल ठरतात. यासाठी तुम्हाला KYC देखील करुन घ्यावी लागेल.

यानंतर कंपनी एक्झिक्यूटीव तुमच्या घरी येऊन एअरटेल डिजिटल टीव्ही इक्विपमेंट इन्स्टॉल करुन जाईल. ही ऑफर 10 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like