पोस्टात गुंतवणुकीसाठी सरकारची ‘ही’ आकर्षक योजना, रिटर्न्ससोबत सिक्युरिटी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पोस्टात अशा अनेक योजना आहेत, ज्या आपल्याला मोठा फायदा मिळवून देतात. गुंतवणूक करण्यासाठी देखील एक योजना आहे. ज्यामध्ये बँके पेक्षा चांगले रिटर्न मिळतात. यामुळे मोठ्या संख्येने लोक या योजनेत पैसे गुंतवत आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत रिटर्न्स सोबत सिक्युरिटीही देते यामुळे या योजनांवर लोकांचा अधिक विश्वास आहे. पोस्टाच्या या योजनेतून इन्कम टॅक्सदेखील वाचवता येऊ शकतो.

बँकेपेक्षा अधिक व्याज

जर तुम्ही पाच वर्षासाठी पोस्ट खात्यात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकेपेक्षा अधिक व्याज मिळेल. बँकेत जर पाच वर्षाच्या मुदतीवर पैसे गुंतवले तर तुम्हाला 5.5 टक्के व्याज देते. याच तुलनेत तुम्ही जर पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षासाठी 6.8 टक्के इतका व्याज दर मिळतो. म्हणजे बँकेपेक्षा पोस्टात 1.3 टक्के व्याज जास्त मिळते

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सध्या 6.8 टक्क्यांचं व्याज मिळते. उत्तम रिटर्न सोबतच या ठिकाणी सिक्युरिटीही मिळते. याशिवाय 80 सी अंतर्गत करात देखील सूट मिळते.

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड

ही केवळ एक पोस्ट ऑफिसची स्किम नाही. मात्र याची लोकप्रियता ही एका पोस्ट ऑफिसच्या स्किमप्रमाणे अधिक आहे. या स्किमवर सध्या 7.1 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, गुंतवणूक जर जास्त कालावधीसाठी करायची नसेल तर हा उत्तम पर्याय आहे.