Jio ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर मिळतोय 1000 रुपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घरात बसून सुद्धा रिचार्ज करता येते. आता रिचार्ज करण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही जर रिचार्ज करीत असाल तर रिलायन्स जिओ आपल्या युजर्संसाठी खास ऑफर आणली आहे. स्मार्टफोनमध्ये वॉलेट ॲप आणि अनेक मोबाइल नेटवर्क प्रोव्हाइडर ॲप रिचार्जची परवानगी देते. यासंबंधी अधिक जाणून घ्या. रिलायन्स जिओ आपल्या युजर्संसाठी एक खास ऑफर आणली आहे. यासंबंधी Paytm, PhonePe, Amazon, Mobikwik आणि Freecharge वरून जियोचा रिचार्ज केल्यानंतर आकर्षक कॅशबॅक ऑफरसह अनेक बक्षीस मिळत आहेत.

Paytm वर ऑफर :
रिलायन्स जिओची ही ऑफर १६ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर एक आकर्षक कॅशबॅक आणि रिवार्ड्स मिळणार आहे. यात १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि १०० रुपयांपर्यंत रिवार्ड्ज जिओवर उपलब्ध आहे.

या नवीन ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी पेटीएम युजर असणे गरजेचे आहे. पेटीएम युजर १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देते. जिओच्या नवीन ग्राहकासाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रिचार्जवर ही ऑफर आहे. तर जुन्या ग्राहकांना १ हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळू शकते. या ऑफरसाठी युजर्सला पेटीएमवरून कमीत कमी ४८ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. यानंतर एक कूपन मिळेल, याचा वापर शॉपिंग आदीसाठी केला जाऊ शकतो.

Mobikwik वरून रिचार्जचा फायदा
जुन्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ५० टक्के (जास्तीत जास्त १०० रुपये) पर्यंत JIO50P कोड मिळू शकतो. मोबीक्विक आधी यूपीआय वरून रिचार्ज करणार्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक देत आहे. यासाठी ग्राहकांना कमीत कमी १४९ रुपये व त्यापेक्षा जास्त किंमतीचा रिचार्ज करावा लागणार आहे. नवीन ग्राहकांना लाभ उठवण्यासाठी ‘NJIO50’ कोड नोंदवावा लागेल.