7 दिवसात ‘या’ 4 ठिकाणी पैसे गुंतवून मिळवा चांगला रिटर्न !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ (IPO) आणले आहेत. या आयपीओत पैसे गुंतवल्यास तुम्ही एका दिवासात लखपती होऊ शकता. २०२१ मध्ये आतापर्यंत अनेक कंपन्यांनी आयपीओ (IPO) आणले आहेत. या माध्यमातून गुंतवणुकदारांना (Investors) चांगला अर्थिक फायदा झाला आहे. जर पुढील ७ दिवसांत मार्केटमधून कमाई करु इच्छित असाल तर तुम्हाला आता चांगली संधी आहे.

येत्या ७ दिवसांत कोणकोणत्या कंपन्यांच्या आयपीओमधून (IPO) तुम्हाला चांगली कमाई करण्याच्या संधी आहेत…जाणून घ्या

या आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये ४ आयपीओ (IPO) दाखल होत आहेत. यात श्याम मेटॅलिक्स, नवोदय एंटरप्रायझेस, अभिषेक इंटीग्रेशन लिमिटेड आणि सोना कॉमस्टार या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगल्या कमाईची संधी मिळू शकते.

सोना कॉमस्टार आयपीओ
सोना कॉमस्टार कंपनी १४ जूनला आयपीओ लॉन्च करीत आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने ५५०० कोटी रुपये जमा करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. हा आयपीओ खरेदीसाठी १४ जूनपासून उपलब्ध होईल. सोना कॉमस्टारने प्रायमरी मार्केटमधून ६००० कोटी रुपये जमा करण्याची तयारी केली होती. परंतु आता ही कंपनी ५५०० कोटी रुपये जमा करणार आहे. आयपीओसाठी कंपनी ३०० कोटी रुपयांचे फ्रेश शेअर जारी करणार आहे.

अभिषेक इंटिग्रेशन लिमिटेड आयपीओ
अभिषेक इंटिग्रेशन लिमिटेडचा आयपीओ ८ जूनला लाँच झाला आहे.
तुम्ही ११ जूनपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करु शकता.
या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने ४.९५ कोटी रुपये जमा करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे.
याची इश्यू प्राईज प्रतिशेअर ५० रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे.

श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड आयपीओ
कोलकाता येथील स्टिल उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड १४ जूनला ९०९ कोटी रुपयांचा इनिशिअल पब्लिक ऑफर लॉन्च करीत आहे.
या इश्यूसाठी प्राईज बॅण्ड ३०३ ते ३०६ रुपये प्रतिशेअर असा ठरवण्यात आला आहे.
याच्या लॉटचा आकार ४८ शेअर असेल. तुम्ही १४ ते १६ तारखेदरम्यान यात पैसे गुंतवू शकता.
अंकर गुंतवणूकदारांसाठी ११ जूनपासून बोली सुरु करण्यात येईल.

नवोदय एंटरप्रायझेस आयपीओ
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नवोदय एंटरप्रायझेस देखील १४ जूनला आपला आयपीओ लाँच करत आहे.
कंपनीचे या आयपीओच्या माध्यमातून ४६.०८ कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य आहे.
तुम्ही हा आयपीओ १७ जूनपर्यंत खरेदी करु शकता.
आयपीओ साठी कंपनीने इश्यू प्राईस २० रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण