देशातील ‘या’ मोठ्या बँकेकडून घ्या ‘बिन व्याजी’ कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील दुसर्‍या क्रमांकाची प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाणारी आयसीआयसीआय बँक आता बिन व्याजी कर्ज देत आहे. तुम्ही एका निश्‍चित मुदतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले तर त्या कर्जावर व्याज देण्याची गरज नाही. आयसीआयसीआय बँकेच्या या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास तुम्हाला काही नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील आणि त्यानंतर तुम्हाला बिन व्याजी कर्ज तात्काळ मिळेल.

बिन व्याजी कर्ज मिळणार-

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या कस्टमर्स PayLater अकाऊंटच्या माध्यमातून बिन व्याजी कर्ज आपण घेवु शकतो. हे PayLater अकाऊंट एक डिजीटल क्रेडिट प्रोडक्ट असून जे एका क्रेडिट कार्ड सारखं चालतं. क्रेडिट कार्डवरून आपण प्रथम खरेदी करतो आणि नंतर त्याचे बील पेमेंट केले जाते अगदी तसेच या खात्यातून केले जाते. या सुविधेनुसार आपल्याला 30 दिवसांसाठी एक ठराविक रक्‍कम उधार दिली जाते. त्या रक्‍कमेला तुम्हाला परत करावे लागते. बँकेच्या या PayLater सुविधेनुसार तुम्हाला 45 दिवसांपर्यंत उधार घेतलेल्या (कर्ज घेतलेल्या) रक्‍कमेवर कुठलेही व्याज आकारण्यात येत नाही.

अशा प्रकारे मिळते ही सुविधा –

आयसीआयसीआय बँकेची PayLater ही सुविधा इंटरनेट बँकिंग, iMobile आणि पॉकेट्स वॉलेटवर उपलब्ध आहे. मात्र, या सुविधेतून घेतलेल्या रक्‍कमेतून (कर्जातून) तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाची रक्‍कम भरू शकणार नाहीत तसेच या रक्‍कमेचा उपयोग इतर दुसर्‍या खात्यात वर्ग करण्यासाठी करता येणार नाही.

बिन व्याजी कर्जाची ही आहे मर्यादा –

तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या PayLater अकाऊंटमधून 5 हजार ते 25 हजारापर्यंत कर्ज घेवु शकता. मात्र, तुम्हाला किती कर्ज मिळु शकते हे तुमच्या बँकेसोबत पुर्वी केलेल्या व्यवहारावर अवलंबुन असेल म्हणजेच ते तुमच्या क्रेडिट स्कोरवर अवलंबुन असणार आहे.

PayLater सुविधेच्या शुल्काबाबत –

PayLater ची सुविधा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे व्याज लागत नाही. मात्र, तुम्ही जर मर्यादेपेक्षा अधिक दिवस बिल भरले नाही तर बँकेडून लेट पेमेंट चार्जेस लागणार आहेत. घेतलेले कर्ज परत करेपर्यंत लेट पेमेंट चार्जेस लागतील.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय