Life Insurance Policy वरही मिळतं सहजपणे कर्ज, असा करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे लोकांना अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत बरेच लोक कर्ज घेत आहेत, कारण त्यांच्या उत्पन्नाची साधने सध्या संपूणपणे संपली आहेत. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे आधीपासूनच एखाद्या कंपनीची जीवन विमा पॉलिसी असेल, तर त्याचा लाभ घेऊन कमी व्याजदराने कर्ज घेता येऊ शकते. विमा कंपन्यांव्यतिरिक्त बँका आणि एनबीएफसी पॉलिसीच्या बदल्यात कर्ज देतात.

जीवन विमा कंपनी एलआयसी देखील पॉलिसीच्या बदल्यात ग्राहकांना कर्जाची सुविधा देत आहे. यात व्याजदर केवळ नऊ टक्के आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता.

इतके कर्ज मिळू शकते
विमा पॉलिसीवरील कर्जाची रक्कम पॉलिसी आणि त्याच्या सरेंडर व्हॅल्यूवर अवलंबून असते. कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या ८० ते ९० टक्के दरम्यान असू शकते. मात्र यात काही अटी आहेत. जेव्हा तुमच्याकडे मनी बॅक किंवा एन्डोउमेंट पॉलिसी (Endowment Policy) असते, तेव्हाच तुम्हाला जास्त कर्ज मिळेल.

फक्त व्याज द्यावे लागेल
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला या कर्जाची परतफेड करावी लागणार नाही, कारण पॉलिसीची मुदत संपल्यानंतर कंपनी कर्जाची रक्कम कापून घेते आणि उर्वरित पैसे तुम्हाला परत दिले देते. अशा परिस्थितीत तुम्हाला केवळ कर्जाचे व्याज परत करावे लागेल. काही कंपन्या कर्जाची रक्कम निश्चित करण्यासाठी तुम्ही किती प्रीमियम भरला आहे ते पाहतात. अशा परिस्थितीत भरलेल्या प्रीमियमच्या ५० टक्के पर्यंत कर्ज देण्यास त्या तयार होतात.

किमान डॉक्युमेंटेशन
विमा पॉलिसीवरील कर्जासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. यामध्ये अर्जासह तुम्हाला जीवन विमा पॉलिसीची सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे जमा करावी लागतील. कर्जाची रक्कम मिळण्यासाठी एक कॅन्सल चेक अर्जासह जोडणे आवश्यक आहे. हा चेक नाव, अकाउंट नंबर, आयएफसी कोडच्या अचूक तपासणीसाठी लावला जातो. विमा पॉलिसीच्या बदल्यात कर्ज घेण्यासाठी Letter of contract वरही स्वाक्षरी करणे आवश्यक असते.