मोदी सरकारकडून घर बसल्या दरमहा ‘फिक्स’ कमाईची ‘सुवर्ण’संधी, FD पेक्षा देखील अधिक ‘रिटर्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही घर बसल्या महिन्याला फिक्स इनकम मिळवू इच्छित असाल तर केंद्र सरकार तुम्हाला उत्तम संधी देत आहे. सरकार आता भारताचा पहिला ‘फिक्स्ड इनकम एक्सचेंज ट्रेडेड फंड’ लॉन्च करणार आहे. ज्यात डझनभर कंपन्याचे डेट सिक्युरिटीज सहभागी असतील. कदाचित डिसेंबर महिन्यात सरकार हे लॉन्च करणार आहे. या ETF ची साइज जवळपास 15 हजार कोटी रुपयांपासून 20 हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

एक वृत्तानुसार, या फंडची मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत आणि डिसेंबर महिन्यापर्यंत याला लॉन्च करण्यात येईल. या फंडमध्ये पीएसयू कंपन्यांना AAA – रेटेड पेपर्स सहभागी असेल.

FD तुलनेत अधिक रिटर्न
डेट ईटीएफ कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यामुळे ते सरकारी सिक्युरिटीमध्ये गुंतवू शकतात. ईटीएफ यूनिट्स एक्सचेंजवर लिस्ट झाल्यानंतर त्यांना रात्रीत लिक्विडिटीची सुविधा मिळू शकते. बँकेकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या फिक्स्ड डिपॉजिटच्या तुलनेत या माध्यमातून 7 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न जनरेट करण्यात येऊ शकतो.

डेट ईटीएफमध्ये बॉन्डच्या तुलनेत कॉर्पोरेट डेट सिक्युरिटीज, क्रेडिट लिंक्ड नोट, डिबेंचर सहभागी असेल. या वृत्तानुसार विश्वास व्यक्त केला जात आहे की मोठ्या सरकारी कंपन्यांना याअंतर्गत ईटीएफचा भाग मिळेल. सरकार याच्या तयारीला लागले आहे आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लॉन्च करण्यात येईल.

सरकारी कंपन्यांना मिळणार फायदा
सरकार या पावलांनंतर गुंतवणूक करणाऱ्यांना एक नवा आणि सोपा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. कॉर्पोरेट बॉन्डमुळे ईटीएफच्या कारणाने सरकारी कंपन्यांकडे बाजारातून पैसे जमा होतील. फिक्ड डिपॉजिटच्या तुलनेत ईटीएफच्या माध्यमातून अधिक रिटर्न मिळू शकतो.

काय असेल टॅक्स सिस्टम
सरकारला विश्वास आहे की ईटीएफमुळे कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढेल आणि गुंतवणूकीचा आधार मजबूत होईल. डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अ‍ॅण्ड पब्लिक असेट मॅनेजमेंटने प्रस्तावित डेट ईटीएफसाठी एडेलवाइज असेट मॅनेजमेंटला असेट मॅनेजमेंट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी डेट म्यूचुअल फंडच्या आधारे टॅक्स व्यवस्था लागू होईल.

देशातील पहिला डेट ईटीएफ
भारतीय बाजारात अनेक इक्विटी आणि गोल्ड ईटीएफ आहे, परंतू आतापर्यंत कोणताही डेट ईटीएफ नव्हता. शिवाय सरकारी सुरक्षा देखील आहे. परंतू यात गुंतवणूकदारांना काही खास रुची नाही. याच वर्षी सरकारने सीपीएसई ईटीएफ च्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये जमा केले आहेत. तर भारत – 22 ईटीएफच्या माध्यमातून सरकारकडे 4,368 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Visit : Policenama.com