PAN CARD : केवळ 2 दिवसात पॅनकार्ड मिळवा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसस्था – सध्याच्या काळात पॅनकार्ड एक अत्यंत महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक झालेले आहे. एखादी मोठी खरेदी करायची असो अथवा टॅक्स भरायचा असो पॅनकार्ड अनिवार्य आहे. आपल्या बँक खात्यामधून ५० हजारांपेक्षा व्यवहार करायचा असेल तरीसुद्धा तो पॅन नंबर शिवाय करता येत नाही. इनकम टॅक्स विभागातर्फे पॅनकार्ड दिले जाते. मात्र आता आपल्याला पॅनकार्ड बनवायचे असेल तर ही प्रक्रिया अत्यंत सोपी झालेली आहे.

एका व्यक्तीला अथवा संस्थेला केवळ एकच पॅनकार्ड बनविता येत असून एकापेक्षा जास्त पॅनकार्ड वापरने कायद्यानुसार गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी १० हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. टॅक्स विभागाने आता इलेकट्रॉनिक पद्धतीनेदेखील पॅनकार्ड देण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन पद्धतीने आवेदन केल्यानंतर केवळ ४८ तासांत हे पॅनकार्ड आपल्याला मिळते.

यासाठी आपल्याला https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकवर जाऊन फॉर्म ४९ए किंवा ४९एए द्वारे अर्ज करावा लागतो. पॅनकार्ड साठी अर्ज करताना काही महत्वपूर्ण कागदपत्रे देखील सादर करावी लागतात. यामध्ये २ पासपोर्ट साईझ फोटो सहित पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा द्यावा लागतो. यामध्ये वयाच्या पुराव्यासाठी जन्मतारखेची नोंद असलेले ओळखपत्र देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जन्माचा दाखला, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी चा समावेश असू शकतो.

आपणाजवळ ई-मेल आयडी आणि स्वतःचा मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज करताय तर याठिकाणी आपली डिजिटल सही देखील अपलोड करणे गरजेचे आहे. हि सगळी माहिती भरल्यानंतर आपण फॉर्म अपलोड करू शकता. पॅनकार्ड व्यक्ती अथवा कंपनीच्या नावाने बनविता येऊ शकते. आपल्या अर्जाची सध्यस्थिती आणि त्यावर झालेली कार्यवाही आपण वेबसाईट वर जाऊन ट्रॅक देखील करू शकता इतकी हि पद्धती सोपी आणि पारदर्शी आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

मेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक