मुंबईच्या धर्तीवर ग्रामीण भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत हक्काची व पक्की घरे मिळावीत : आमदार अशोक पवार

शिक्रापुर – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये वाघोली, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, , उरूळी कांचन या गावासह शिरुर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी असून तेथील रहिवाशांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध ह्याव्यात यासाठी शिरुर हवेलीचे आमदार सदैव प्रयत्नशील असून या झोपडपट्टी परिसरात झोपडपट्टीवासीयांना मुंबईच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( SRA ) अंतर्गत हक्काची आणि पक्की घरे मिळावीत यासाठी आता आमदार अशोक पवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा व वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांना शहरानजीक वाढत असलेल्या गावांमध्ये एसआरए योजना राबविण्याबाबत प्रयत्न करावे तसेच राज्यात झोपडपट्टी असणाऱ्या ठिकाणी उच्चतम विकासकाकडून झोपडपट्टी भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे या बाबत पत्रव्यवहार केला आहे.

तर राज्याचे गृहनिर्माण विकास मंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगाने यांना देखील पत्रव्यवहार करून महाराष्ट्र गृहनिर्माण विकासमंडळ यांच्या माध्यमातून शिरूर शहर व वाघोलीतील झोपडपट्टी असणाऱ्या शासकीय जागेवर झोपडपट्टीधारकांना मोफत घरे बांधून मिळावी यासाठी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे.

मुंबईच्या धर्तीवर एसआरए योजना ग्रामीण भागात राखवल्यास ग्रामीण भागातील गरीबांना हक्काची घरे उपलब्ध होतील

अशोक पवार (आमदार शिरुर हवेली)