खुशखबर ! फक्त ‘एवढं’ करा आणि मिळवा ‘या’ 3 मोठ्या सरकारी बँकेकडून 1% ‘स्वस्त’ व्याजदराने कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना जास्तीचे कर्जवाटप करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याचा परिणाम बँकिंग सेक्टरमध्ये दिसून येत आहे. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया आणि सिंडिकेट बँक यांनी क्रेडिट स्कोअरच्या आधारे आपल्या ग्राहकांना कर्ज देणे सुरू केले आहे. या तिन्ही बँकांनी भारतीय पत माहिती ब्युरो (CIBIL) कडून मिळालेल्या क्रेडिट स्कोर स्लॅबच्या आधारे कर्ज देणे सुरू केले आहे.

असा होईल एक टक्का फायदा :
नवीन बाह्य बेंचमार्किंग प्रणालीअंतर्गत बँक ऑफ बडोदा आता नवीन कर्ज देण्यासाठी सिबील स्कोअरचा वापर करेल. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, जर ग्राहकांकडे ९०० पैकी एकूण ७६० आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असेल तर त्यांना ८.१ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. जर क्रेडिट स्कोअर ७२५ ते ७५९ च्या दरम्यान असेल तर कर्जाचा व्याज दर ८.३५ टक्के निश्चित करण्यात आला आहे. त्याच वेळी, जर आपल्याकडे ६७५ आणि ७२४ दरम्यान क्रेडिट स्कोर असेल तर आपल्याला ९.१ टक्के व्याज द्यावे लागेल. अशा प्रकारे किमान आणि जास्तीत जास्त व्याज दरामध्ये १ टक्के फरक असेल. अशा परिस्थितीत जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तो १ टक्के कमी दराने कर्ज घेऊ शकतो.

बँक ऑफ बडोदाचा लोन फ्लोटिंग रेट बाह्य बेंचमार्कशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत या बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज दराची रक्कम कर्जाची रक्कम आणि कालावधीच्या आधारे निश्चित केली जाणार नाही. या तीन बँका CIBIL ने उपलब्ध केलेल्या पतसंख्येवर (क्रेडिट स्कोअर) आधारित कर्ज देतील.

क्रेडिट स्कोअर मेंटेन करणे गरजेचे
बाह्य बेंचमार्कच्या आधारे व्याज दर निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना पत जोखीम प्रीमियम घेण्याची परवानगी दिली आहे. आरबीआयच्या या परवानगीनंतर आता कर्जासाठी क्रेडिट स्कोअरची गरज आणखी वाढली आहे. १ ऑक्टोबरपासून नव्या फ्लोटिंग दरावर किरकोळ कर्ज निश्चित करण्यासाठी बँकांनी बाह्य बेंचमार्क स्वीकारला आहे. कर्जाच्या संपूर्ण कालावधीत क्रेडिट स्कोअर तितकाच महत्त्वाचा असेल जितका तो कर्ज मंजुरीच्या वेळी असेल.

visit : policenama.com 

You might also like