फडणवीसांना ‘कोरोना’ची लागण, एकनाथ खडसे म्हणाले…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाली आहे. कोविड चाचणीचा (test) अहवाल पॉझिटिव्ह (positive) आल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. ही माहिती मिळताच एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी फडणवीस यांना ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. नाशिक (nashik) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा भाजपमधील नव्या नेतृत्वावर टीकेची तोफ डागली. मागच्या चार वर्षापासून मी भीतीच्या छायेखाली होतो. आता निर्दोष सुटले आहे. त्यामुळे माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं आहे. आता इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार, असा इशारा देखील खडसेंनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी हे काही दिवसांत कळेलच, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्याचाही खडसे यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील हे कुल्फी आणि चॉकलेट देऊन भाजपमध्ये प्रवेश देतात, असा प्रतिटोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

You might also like