गॅस सिलेंडर बुक करा अन् 700 रुपयांपर्यंतचा Cashback मिळवा, जाणून घ्या ऑफर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   ऑनलाइन पेमेंट अ‍ॅग्रीगेटर Paytm ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत घरगुती गॅस सिलिंडर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 700 रुपयापर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. Paytm ची ही खास ऑफर केवळ 31 मार्चपर्यंत असणार आहे. म्हणजे सिलिंडर अगदी स्वस्तात खरेदी करण्यासाठी आता फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. ही ऑफर केवळ Paytm या अ‍ॅपवरुन पहिल्यांदा गॅस बुकिंग करणाऱ्यांसाठीच राहणार आहे.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवरील Paytm अ‍ॅपवर जााऊन Show More वर क्लिक करा. त्यानंतर Recharge and Pay Bills या ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्यासमोर book a cylinder चा पर्याय दिसेल. याठिकाणी तुम्हाला गॅस सिलिंडर घरपोच करणाऱ्या डिलरची निवड करा. त्यानंतर सिलिंडर बुक करण्याआधी FIRSTLPG चा प्रोमो कोड भरावा लागणार आहे. प्रोमो कोडचा वापर केल्यानंतर सिलिंडरची पूर्ण किंमत तुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल. सिलिंडर बुक केल्याच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक देखील प्राप्त होईल. यासाठीचे एक स्क्रॅचकार्ड तुमच्या पेटीएम अ‍ॅपमध्ये येईल.पेटीएमचे हे कॅशबॅक स्क्रॅच कार्ड तुम्हाला सात दिवसांच्या आत वापरावे लागणार आहे. दिल्लीत 14.2 किलोग्रॅमचा घरगुती सिलिंडरची किंमत 819 इतकी आहे. Paytm च्या ऑफर सकट तुम्हाला सिलिंडर केवळ 119 रुपयांत खरेदी करता येईल.