Alert ! लवकरात लवकर बनवा ‘हे’ 6 आवश्यक सर्टिफिकेट्स, अन्यथा रस्त्यावर धावू शकणार नाही तुमची गाडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही सुद्धा रस्त्सावर बाईक, कार किंवा अन्य कमर्शियल वाहन चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा लोक गाडी घेऊन रस्त्यावर येतात पण गाडीची सर्व कागदपत्र सोबत ठेवायला विसरतात. ज्यामुळे लोकांचे चलान सुद्धा कापले जाते. असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत, जे ड्रायव्हिंग सीटवर बसण्यापूर्वी तुमच्याकडे असायला हवेत, ते आपण जाणून घेण्यार आहोत. तसेच हे डॉक्युमेंट्स कशाप्रकारे आणि कुठून मिळवू शकता ते सुद्धा जाणून घेवूयात…

हे आहेत महत्वाचे डॉक्यूमेंट्स
1. ड्रायव्हिंग लायसन्स
2. फिटनेस सर्टिफिकेट
3. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी)
4. परमिट
5. पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (पीयुसी)
6. इन्श्युरन्स

1 ड्रायव्हिंग लायसन्स
लर्निंग आणि परमनंट असे दोन प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असते. लर्निंग 6 महिन्यांसाठी व्हॅलिड असते. या दोन्हीसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफ लाईन अ‍ॅप्लाय करू शकता. ऑनलाइनसाठी Parivahan.Gov.In वर भेट द्यावी लागेल. तर ऑफलाईनसाठी जवळच्या आरटीओ ऑफिसमध्ये जावे लागते.

2. फिटनेस सर्टिफिकेट
हे कमर्शियल वाहनांसाठी खुप आवश्यक असते. आरटीओ कार्यालयात जाऊन हे सर्टीफिकेट बनवू शकता. गाडीच्या तपासणीनंतर हे प्रमाणपत्र दिले जाते. कमर्शियल वाहनांना हे दरवर्षी रिन्यू करावे लागते. वैयक्तिक वाहनांसाठी 15 वर्षांकरता असते.

3. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
हे पंधरा वर्षांनी रिन्यू होते. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सुद्धा मिळते. हे काम डिलर पूर्ण करून देतो.

4. परमिट
कमर्शियल वाहनासाठी परमिट आवश्यक असते. राष्ट्रीय आणि स्टेट असे परमिटचे दोन प्रकार आहेत. आरटीओ कार्यालयात जाऊन तुम्ही परमिट बनवू शकता. प्रत्येक राज्याच्या बॉर्डरवर परिमिट बूथ असतो, येथे तुम्ही बनवू शकता. ऑनलाइन परमिट सुद्धा घेऊ शकता.

5. पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (पीयूसी)
सर्व वाहनांना पीयूसी बंधनकारक आहे. गाडीद्वारे होणार्‍या प्रदुषण नियंत्रणाचे मानक पूर्ण आहे किंवा नाही हे यातून समजते. शहरात तसेच हायवेला अनेक ठिकाणी पीयूसी सेंटर असतात, तिथे गाडीची टेस्ट करू शकता.

6. इन्श्युरन्स
प्रत्येक वाहनाला थर्ड पार्टी इश्युरन्स बंधनकारक आहे. मोटर इन्श्युरन्सचा वैधता संपली असेल तर तुम्ही कायदेशीर गुन्हेगार आहात. यासाठी दंड भरावा लागतो. यासाठी इन्श्युरन्स वेळीच रिन्यू करून घ्या.