सुरक्षित सांगलीसाठी मंडळाकडून सीसीटीव्हीसाठी निधी

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईन

सुरक्षित सांगली, चांगली सांगलीसाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नवरात्र, गणेशोत्सव मंडळांकडून सीसीटीव्हीसाठी निधी देण्यात आला. सोमवारी अधीक्षक शर्मा यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात आला. डॉल्बीला फाटा देत मंडळांनी शर्मा यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रोख रक्कम, धनादेश दिले. या सीसीटीव्हींचे संबंधित मंडळांकडूनच उद्घाटन करण्यात येणार असल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

गणेशोत्सव, मोहरम, नवरात्रोत्सव यामध्ये डॉल्बीला फाटा देऊन शहर सुरक्षित बनवण्यासाठी सीसीटीव्हीला निधी द्यावा असे आवाहन अधीक्षक शर्मा यांनी केले होते. त्याला आतापर्यंत अनेक मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये सांगली, कुपवाड आणि मिरजेतील विविध मंडळांचा सहभाग आहे.
[amazon_link asins=’B071JWBFDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dadc50a4-d09b-11e8-ae6d-bb876c0ae1f9′]

सोमवारी सांगलीतील कलानगर येथी जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मिलींद वाईंगडे यांनी तीन हजार, ओमगणेश कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशोक शेट्टी यांनी दहा हजार, खणभागातील विजय चौक मंडळाच अध्यक्ष सचिन मोहिते यांच्याकडून पाच हजार, गोल्डन क्लब गणेश मंडळाकडून सात हजार असा पंचवीस हजारांचा निधी अधीक्षक शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अधीक्षक शर्मा म्हणाले, सध्या महापालिका क्षेत्रात 80 उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यातून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. शहर सुरक्षित बनवण्यासाठी दोनशे सीसीटीव्हींची आवश्यकता आहे. त्यासाठी केलेल्या आवाहनानुसार मंडळांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, जतच्या उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचेे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, कवठेमहांकाळचे निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते.