व्यावसायिकाचा डोक्यात फरशी घालून खून

घाडगेवाडी (ता.खानापूर) : पोलिसनामा ऑनलाईन
घाडगेवाडी येथील रहिवासी अरुण प्रल्हाद घाडगे (वय: ३१) या गलाई व्यवसायिकाचा अज्ञातांकडून डोक्यात फरशी घालून व गळा आवळून खून करण्यात आला. या परिसरात त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. १ मे ) रोजी रात्री घडली. हा खून कोणी व कशासाठी केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याबाबत वडील प्रल्हाद मारुती घाडगे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.