काय सांगता ! होय, घानात घुमला ‘जय महाराष्ट्र’चा जयघोष, फुटबॉलपटूनं मानले महाराष्ट्राचे आभार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेला फुटबॉलपटू घानामध्ये जाऊन जय महाराष्ट्राचा जयघोष करत आहे. मुंबईने दिलेल्या प्रेमाबद्दल तो घानामध्ये जाऊन स्तुतीसुमने उधळत आहे . लॉकडाऊनचा फटका घानाचा फुटबॉलपटू रॅन्डी जुआन म्युलरला बसला होता. तब्बल पाच महिन्यानंतर मुंबईत अडकलेला हा खेळाडू सुखरूप घरी पोहचला आहे.

लॉकडाऊन घोषित होताच म्युलर मुंबई विमानतळावर अडकला होता. त्यानंतर लॉकडाऊनचा फटका बसल्याचे त्याने ट्वीटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले होते. युवा सेनेने याची तातडीने दखल घेतली आणि त्याला मदतीचा हात दिला. म्युलरने मायदेशात परताच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल यांचे आभार मानले. त्याने एका व्हिडिओद्वारे ’जय महाराष्ट्र’ म्हणत महाराष्ट्राने केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केल्यावर 74 दिवस रॅन्डी जुआन म्युलरने मुंबई विमानतळावर अडकला होता.

त्यानंतर त्यांची वांद्र्यातल्या एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विमानसेवा सुरु झाल्यानंतरच युवासेनेने याचा संपूर्ण खर्च उचलत त्याला मायदेशी रवाना केले आहे . फुटबॉलपटू म्युलर विमानतळावरच्या कर्मचार्‍यासोबत वेळ घालवायचा, मुंबई विमानतळावरच्या कर्मचार्‍यांनी त्याला खुप मदत केली. त्यांच्याशी बातचीतसह खाण्यापिण्याच्या गोष्टी शेअर करत होते. जेव्हा त्याचे पैसै संपले तेव्हाही कर्मचारी त्याला समोसे, वडे जमेल ते पदार्थ पुरवत होते. या काळात म्युलरनंही कोणत्याही खाण्याची मागणी केली नाही. काही लोकांनी त्याला पुस्तकं वाचायला दिली जी वाचून म्युलर वेळ घालवत होता.