जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Ghansawangi Assembly Constituency | महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) तीन-तीन पक्ष सहभागी असल्याने एका मतदारसंघात अनेकजण इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा वरिष्ठ नेत्यांसमोर मोठा तिढा निर्माण झाला आहे. उमेदवारीवरून मतदारसंघात कुरघोडीचे राजकारण सुरु आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. याठिकाणी शरद पवार पक्षाचे राजेश टोपे (Rajesh Tope) हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे येथे अजित पवार गट (Ajit Pawar NCP) दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.
https://www.instagram.com/p/DBA9cYUi9FC/
दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून (Shivsena Thackeray Group) डॉ. हिकमत उढाण (Udhan Hikmat) हे शिंदे गटात प्रवेश (Shivsena Shinde Group) करून ही जागा पदरात पाडून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. हेच इरादे ओळखून आता भाजन नेत्याने पक्षालाच इशारा दिला आहे. भाजपा विधानसभाप्रमुख सतीश घाटगे (Satish Ghatge) यांनी कार्यकर्त्यांची मेळाव्याप्रसंगी बोलताना घनसावंगी मतदारसंघावर दावा ठोकला आहे. (BJP)
पंचवीस वर्षापासून मंत्री व आमदार राहिलेल्या नेत्याच्या विरोधात पक्षाचे काम करून भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे जर पक्षानं डावललं तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा धमकीवजा इशारा घाटगे यांनी दिला आहे.
सतीश घाटगे म्हणाले, “गेल्या निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झाला. परंतु त्यानंतर भाजपाने घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ताकद वाढविली आहे. मतदारसंघाला विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी या भागातील आमदार कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्यांचा प्रतिनिधित्व करणारा असावा या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. या मतदारसंघाचा आमदार भाजपचाच असावा त्यामुळं ही जागा भाजपला सोडण्यात यावी अन्यथा वेगळा निर्णय घेतला जाईल, असे घाटगे यांनी म्हंटले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार