Kolhapur News : बोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गी – मंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोल्हापूर येथील बोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, याबाबत राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गृहनिर्माण विभागासोबत मुंबईत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत महापालिकेला सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बोंद्रेनगर झोपडपट्टी या शासकीय जागेवर असलेल्या झोपडपट्टीचे अतिक्रमण नियमानुसार करण्यास कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थीद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदानाखालील येथील झोपडपट्टीतील घरे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ७७ पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण विभाग व महानगरपालिका यांनी लवकर कार्यवाही करावी. तसेच महानगरपालिकेने तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याचे आदेश कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.