‘बकरी ईद’बद्दल भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलाची द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाला बऱ्याचदा वाचाळवीर नेत्यांनी अडचणीत आणले आहे. आता उत्तरप्रदेशमधील अजून एका भाजपा आमदाराने भाजपला चांगलेच अडचणीत आणले आहे. गाझियाबाद मधील लोणी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी ईद काळात होणाऱ्या ‘कुर्बानी’ बद्दल विवादास्पद विधान केले आहे. ” कोरोना असल्यामुळे कुर्बानी देऊ नये जर कुर्बानी द्यायची असेल तर तुमच्या मुलांची द्या”, असे गुर्जर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी कुर्बानी देणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पुढे बोलताना गुर्जर म्हणाले की,” ज्यांना कोणाला कुर्बानी द्यायची आहे त्यांनी आपल्या मुलांची द्यावी. निष्पाप प्राण्यांना मारून खाल्लं तर पुढल्या जन्मी बकऱ्याचाच जन्माला याल. मग तुम्हालाही असं कापून खाल्लं जाईल. जशास तसं तुम्हाला भोगावे लागेल.” असं उत्तरप्रदेशचा एक आमदार बोलत आहे यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये आमदाराविरोधात चांगलाच राग दिसून येत आहे.

सरकार सध्या सगळ्यांना घरी राहण्याचं आवाहन करत आहे. सामाजिक ठिकाण जायचे टाळावे तसेच धार्मिक कार्यक्रम घरच्या घरी असंही सांगताना दिसत आहे. परंतु काही लोक सामूहिक नमाज पठण आणि कुर्बानीसाठी अडून बसल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच समाजवादी पार्टीचे (सपा) खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हंटल होतं की, ईद हा मोठा सण असून यादरम्यान सर्व मुस्लिम बांधव बाजारात जाऊन खरेदी करत असतात. परंतु आता जनावरांचे बाजार बंद आहेत मग यामुळे सण कसे साजरे करायचे, हा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.