Coronavirus : आयसोलेशन वार्डात पॅन्ट न घालता फिरतायेत तबलिगी जमातीचे रुग्ण, DM-SSP कडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथे आयोजित तबलिगी जमातीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आयोजित कार्यक्रमात प्रत्येक राज्यातून बरेच लोक सहभागी होण्यासाठी आले होते. आता कोरोना विषाणूची बातमी पसरताच सर्व राज्ये सतर्क झाली आहेत.

यूपीमध्येही अशा लोकांना ओळखले गेले आहे आणि त्यातील काही लोकांना वेगळे ठेवण्यात आले आहे. गाझियाबाद येथील रुग्णालयात जमातीमधील काही लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले गेले होते. परंतु त्यांची वागणूक सामान्य असल्याचे दिसत नाही. त्यामुळे तक्रारीच्या आधारे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाझियाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक (सीएमएस) यांनी घंटाघर कोतवालीमध्ये याबाबत माहिती दिली आहे. एमएमजी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी पत्र लिहून तक्रार केली आहे की, आसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलेल्या कोरोना विषाणूचे संभाव्य रुग्ण तबलिगी गटाशी संबंधित आहे. ते रुग्ण कपड्यांशिवाय वॉर्डात फिरतात.

एमएमजी हॉस्पिटलमध्ये बनवलेल्या आयसोलोशन वॉर्डात काम करणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध अश्लील कृत्ये केल्याने, सहकार्य न केल्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच आदेशानुसार, पोलिस ठाण्यात गाझियाबाद येथे गुन्हा क्रमांक 288/20 कलम 354, 294, 509, 269, 270 आणि 271 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त पत्रात असेही लिहिले आहे की, एकत्रित रूग्ण कर्मचारी परिचारिकासमोर अश्लील गाणी ऐकतात आणि घाणेरडी हावभाव करत असतात. एवढेच नव्हे तर ते डॉक्टर आणि परिचारिकांकडून बिडी आणि सिगारेटची मागणीही करीत आहेत.

वास्तविक असे सांगितले जात आहे की, रुग्णालयातील काही परिचारिकांनी आयसोलेशनमध्ये ठेवलेल्या जमाती रुग्णांची जिल्हा रुग्णालयाच्या सीएमएसकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्याचबरोबर या तक्रारीनंतर तबलिगी जमातमधील रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाने तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 विदेशी नागरिकांना ब्लॅकलिस्ट केले आहे. यासह या सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसादेखील रद्द करण्यात आले आहेत, कारण हे सर्व पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. याबरोबरच, केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिस आणि अन्य संबंधित राज्यांच्या पोलिस महासंचालकांना परदेशी कायदा 1946 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या नियमांटे उल्लंघन केल्याबद्दल तबलिगी जमात प्रकरणात 960 परदेशी लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.