३ मुलं आणि पत्निचा खून करणारा साॅफ्टवेअर इंजिनिअर कर्नाटकातून जेरबंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गाजियाबाद येथील इंदापूरम येथे पत्नीसह ३ मुलांची हत्या करून फरार झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पोलिसांनी कर्नाटक मधून ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी ३ वाजता खून करून तो फरार झाला होता.

सुमित इंदिरापूरम असे या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. त्याने पत्नी अंशु (वय ३२), मुलगा परमेश (वय ५) आणि आकृती व आरव या ४ वर्षाच्या दोन जुळ्या मुलांचा शनिवारी रात्री ३ वाजता चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर फ्लॅट बंद करुन तो पळून गेला. फरार झाल्यानंतर त्याने रविवारी सायंकाळी ६ वाजता आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ टाकला. त्यात त्याने आपण कुटुंबाची हत्या केली असून मी आता आत्महत्या करायला जात असल्याचे देखील म्हटले होते. हा व्हिडिओ पाहिल्यावर कुटुंबाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, हा व्हिडिओ पाठविल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमितचा शोध घेण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी पथके पाठविली होती.

दरम्यान, कर्नाटक मधील उडपी येथे सुमित असल्याचे पोलिसांना कळाले त्यावेळी पोलिसांनी सुमितला ताब्यात घेतले.

सुमितची नोकरी सुटली आहे. त्यातूनच कुटुंबात सातत्याने वाद होत होते. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता.