प्रेयसीनं आई-वडिलांसोबत मिळून केला प्रियकराचा खून, घरातच ‘पुरला’ मृतदेह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – गाजियाबाद येथे साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात 9 ऑक्टोबरला झालेल्या एलएलबीच्या एका विद्यार्थ्यांच्या हत्येचा पोलिसांनी खुलासा केला. ही हत्या त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमिकेनेच घडवून आणली होती. या हत्येत फक्त मुलगीच नाही तर तिचे आई वडील दोघे सहभागी होते. पोलिसांनी या तीनही आरोेपींना ताब्येत घेतले आहे.

पोलिसांच्या मते, विद्यार्थ्याचे पुर्वीच्या घरमालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. यामुळे हत्येचे हा कट पूर्वीचा घर मालक आणि त्याच्या पत्नीने रचला होता. त्यानंतर नातेवाईकांच्या दबावातून मुलीला देखील आई वडीलांनी त्यांच्या कटात ओढले होते आणि विद्यार्थ्याच्या हत्येचा कट रचण्यात आला.

एवढेच नाही तर हत्येनंतर मृतदेह लपवण्यासाठी 10 फूट खोल खड्डा घरातच 4 दिवसांपूर्वीच खोदण्यात आला होता. हत्येआधी घरमालकाने एलएलबीच्या विद्यार्थ्यांला आपल्या मुलीच्या माध्यमातून घरी बोलावले आणि त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुलाचा मृतदेह पुरुन सर्वजण फरार झाले.

तरुण गायब झाल्यानंतर तपास करण्यात आल्यानंतर पोलिसांनी 14 ऑक्टोबरला विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला, परंतू आरोपी फरार होते. याची माहिती क्षेत्राधिकारी राकेश कुमार मिश्र यांनी देताना सांगितले की पंकज नावाचा विद्यार्थी साहिबाबाद भागातील एका महाविद्यालयात एलएलबीचे शिक्षण घेत होता. तो सायबर कॅफे देखील चालवत होता. त्याचे प्रेमसंबंध गिरधर एनक्लेव कॉलनीमध्ये राहणाऱ्या पूर्वीच्या घरमालकाच्या म्हणजेच हरिओम यांच्या मुलीशी होते. तपासानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.

Visit : Policenama.com