सामुहिक आत्महत्या ! ‘डोअर’वर 500-500 रूपयांच्या नोटा चिटकवल्या, लिहीलं – ‘हा अंत्यसंस्काराचा खर्च’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकाच परिवारातील पाच जणांनी आत्महत्या करून आपल्या अंतिम संस्काराबाबत देखील सांगून ठेवले आहे. भिंतीवर ५०० रुपयांच्या नोटा चिटकवून सर्व कुटुंबियांना एकसाथ अग्नी दिला जावा अशी मागणी केली आहे. सोबतच काही ब्लँक चेक देखील सही करून ठेवले होते. व्यापारात झालेले नुकसान आणि नातेवाईकांकडून झालेली फसवणूक यामुळे कुटुंब प्रमुख गुलशन वासुदेव यांनी आपल्या दोन पत्नींसोबत आधी मुलाला आणि नंतर मुलीला मारले आणि स्वतः आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गाजियाबादमधील इंदिरापुरम येथील हा धक्कदायक प्रकार आहे.

आपल्याच साडूला धरले जबाबदार
भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राकेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. जो की मृत गुलशन यांचा साडू आहे. कुटुंबाच्या मृत्यू साठी राकेश वर्मा जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. मृत व्यक्तीच्या भावाने सांगितले की, राकेश वर्माने केलेल्या फसवणुकीमुळे मृत व्यक्तीला दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

पोलिसांनी सांगितले हे कारण
पोलिसांनी सांगितले की सुसाइड नोटनुसार ही एक आत्महत्या आहे ज्याचे कारण परिवारातील आर्थिक बाबी आहेत तसेच व्यक्तीवर मोठे कर्ज देखील होते.

पाळीव सश्याला देखील मारले
गुलशन आणि त्याच्या दोन पत्नींनी झोपेत असलेला मुलगा ह्रितिक आणि मुलगी किट्टू यांचा रस्सीने गळा आवळला मात्र त्यांना जाग येताच घरातील सुऱ्याने त्यांनी मुलांचा गळा कापला. त्यानंतर घरात पाळलेल्या सश्याला देखील त्यांनी मान मुरगळून मारून टाकले.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like