धक्कादायक ! एकाच कुटूंबातील ५ जणांची सामुहिक आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील गाजियाबाद मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील न्यू शताब्दीपुरम भागात एका घरात पती, पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत पाचही जणांच्या तोंडावर काळ्या रंगाचे चिकट टेप चिकटवण्यात आले होते. पोलीस या घटनेला आत्महत्या मानत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव प्रदीप असून त्याची पत्नी एम्समध्ये नर्स होती. त्याचबरोबर त्यांच्या मृत मुलांची वयं हि अनुक्रमे ८, ५, आणि ३ वर्ष होती. मृत प्रदीप याला दारू पिण्याची सवय होती. पोलिसांनी या सर्व मृतदेहांना पोस्टमार्टम साठी पाठवले असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांना या घटनेची माहिती मिळाली कि एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना घरात ३ लहान मुलींचे मृतदेह आढळून आले. त्याचबरोबर एका महिलेच्या डोक्यावर घाव घालून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ३७ वर्षीय इसम प्रदीप याने या सर्वांना मारून स्वतः आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुसाइड नोट मिळाली

गाजियाबादच्या एसपींनी माहिती दिली कि, घटनास्थळी एक सुसाइड नोट मिळाली असून पोलीस यासंबंधी तपास करत आहेत. त्यानंतर शेजाऱ्यांनी बोलताना सांगितले कि, प्रदीप दारू पीत असे त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी भांडण होत असे. मागील काही दिवसांपासून प्रदीप याने एका खासगी कंपनीत नोकरी सुरु केली होती. मृत व्यक्ती त्याचे आई वडील, मुले आणि पत्नीसह राहत होता. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर त्याच्या रूममधून कोणीही बाहेर न आल्याने घरातील इतर सदस्यांनी दरवाजा ठोठावला असता त्यांनी उत्तर मिळाले नाही.

त्यानंतर त्यांनी डोकावून पाहिले असता त्यांना सर्व जण मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली असून यामागे काय कारण होते, याचादेखील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा