आनंदानंतर लगेचच शोककळा, 4 वर्ष केलं Love आणि प्रेमविवाहाच्या 4 दिवसानंतर दोघांनी केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर चार दिवसांनी पतीने रेल्वेसमोर उडी मारून आपला जीव दिला, त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. चार वर्षांच्या प्रेमानंतर दोघे वैवाहिक बंधनात बांधले गेले होते. कविनगर पोलिस स्टेशन परिसरातील गोविंदापुरम भागातील ही घटना आहे. मृत वराचे नाव विशाल असून तो परिसरातील कोचिंग सेंटरमध्ये कॉमर्स क्लास चालवित होता. तर वधूचे निशा असून ती एका बहु-राष्ट्रीय कंपनीत एचआर मॅनेजर होती.

दोघेही चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते,यानंतर 29 जून रोजी कुटुंबाच्या संमतीने दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर सासरच्या घरी पोहोचल्यावर निशाने सर्व विधी आनंदाने पूर्ण केले, याचा पुरावा म्हणून व्हिडिओदेखील आहे, ज्यामध्ये कंगनाचा एक रीत आनंदाने पार पडली. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी सर्व विधी पार पाडल्यानंतर विशाल न सांगताच घराबाहेर पडला, त्यानंतर संध्याकाळपर्यत घरी परत न आल्यावर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळविले. विशालचा भाऊ म्हणतो की, विशाल संध्याकाळपर्यत परत आला नाही तेव्हा आम्ही त्याला फोन केला असता त्याचा फोन घरातच मिळाला. त्यानंतर त्याने 112 वर पोलिसांना विशाल बेपत्ता झाल्याची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटो कुटुंबियांकडून घेतला आणि थोड्याच वेळात पोलिसांनी एका मृतदेहाची ओळख विशालच्या रूपाने केली.

विशालच्या भावाने सांगितले की, त्याने रेल्वेसमोर आपला जीव दिला आहे, पण आत्महत्येमागील कारण अद्याप समजले नाही. विशालच्या मृत्यूची दुखद बातमी निशाच्या कुटुंबियांना कळताच सर्वाना धक्का बसला. मृत्यू नंतर विशालवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि कुटुंबीयांनी निशाला त्याच्या माहेरी आणले आणि तिथे आल्यानंतर कुटुंबाने विशालच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला.

चौकशी दरम्यान निशाच्या भावाने संगीतले की विशाल आणि निशा दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही चांगले काम करत होते, विशाल कोचिंग चालवत असे, तर त्याची बहीण निशा मल्टी नॅशनल कंपनीत एचआर पोस्ट्सवर कार्यरत होती. विशालच्या मृत्यूनंतर निशाला धक्का बसला आणि तिने गळफास लावून आत्महत्या केली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत कि, चार वर्षांच्या प्रेमानंतर विवाह बंधनात अडकले, मग आत्महत्येने कारण असू शकते?