Ghe Bharari | महिलांना सक्षम बनवणारे ‘घे भरारी’चे व्यासपीठ ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात महिला उद्योजकांची भावना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ghe Bharari | “छोट्या महिला उद्योजिकांच्या पंखाना बळ देत स्वतःच्या पायावर उभा राहण्याची जिद्द व प्रेरणा ‘घे भरारी’ने दिली आहे. ‘घे भरारी’चे व्यासपीठ मिळाल्याने हजारो महिला सक्षम झाल्या असून, आज त्या दिमाखात व्यवसाय चालवत आहेत. कोरोनाच्या पडत्या काळात उभारी घेण्याची उमेद ‘घे भरारी’ने दिली. एक कुटुंब म्हणून सगळ्यांना आधार दिला,” अशा भावना यशस्वी महिला उद्योजकांनी व्यक्त केल्या. (Ghe Bharari)

 

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘घे भरारी’ या महिलांच्या डिजिटल ग्रुपने गेल्या दोन-अडीच वर्षांत घेतलेल्या महाभरारीचा आनंद सोहळा कोथरूड येथे आयोजिला होता. शेकडो सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात ग्रुपसाठी विशेष योगदान देणाऱ्या, यशस्वी व्यवसाय करणाऱ्या सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अनेकींनी आपल्या भावना व्यक्त करत ‘घे भरारी’ ग्रुपचे आभार व्यक्त केले. (Ghe Bharari)

लॉकडाऊनच्या काळात निर्जन रस्ते, बंद पडलेले व्यवसाय आणि ठप्प झालेली अर्थव्यवस्था अशी अवस्था होती. त्या अवस्थेतून नवा मार्ग शोधण्यासाठी महिला उद्योजकांचा ‘घे भरारी’ हा ग्रुप स्थापन करण्यात आला. या ग्रुपच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यवसायासाठी विविध व्यासपीठे उपलब्ध करून देण्यात आली. त्यातून या महिलांनी आपल्या उद्योगाच्या प्रगतीचा नवा मार्ग शोधला. आज ग्रुपच्या १ लाख ८५ हजार सदस्या असून, त्या सगळ्या आपापल्या व्यवसायात वेगाने प्रगती करताहेत, याचा आनंद वाटतो, असे ‘घे भरारी’चे संस्थापक राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी-एदलाबादकर यांनी सांगितले.

व्यवसायात उत्तुंग शिखरे गाठायची असतील, तर फेसबुकवर घे भरारी® हा ग्रुपला
(Ghe Bharari Facebook) भेट द्यावी किंवा ghebharari19
हे इंस्टा हँडल फॉलो करावे. यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा पाहण्यासाठी घेभरारीची ‘गोष्ट जिद्दीची’
हे युट्यूब चॅनल फॉलो करावे, असे आवाहन राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) यांनी केले.

Web Title : Ghe Bharari | The platform of ‘Ghe Bharari’ empowering women! Emotions of women entrepreneurs at the felicitation ceremony organized on the occasion of International Women’s Day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget 2023 | राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांच्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?

Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी प्राईड अवार्डने सन्मान

Kolhapur ACB Trap | स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी, सी.पी.आर. हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Prathamesh Abnave | प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती