घोरपडे पेठेत इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू ; बांधकाम व्यवसायिकासह सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना चौथ्या मजल्यावरुन पडून झालेल्या घटनेत मजुराचा मृत्यू झाला. ही घटना घोरपडे पेठेतील के. बिल्डिंग, एस. आर. ए. प्रोजेक्ट सिटीमध्ये घडली.

रामजी रामनेहूर पटेल (वय २२, रा. लोहियानगर, मूळ-मध्यप्रदेश ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी के. बिल्डिंग, एस. आर. ए. प्रोजेक्ट सिटीचे बांधकाम व्यवसायिक आणि सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेत लोहियानगरमध्ये के. बिल्डिंग एस. आर. ए. प्रोजेक्ट सिटीमध्ये रामजी चौथ्या मजल्यावर काम करीत होता. त्यावेळी तोल गेल्याने खाली पडून रामजी ठार झाला. कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/