२० वर्षापासून भूताला पकडून नाचतो ‘हा’ तांत्रिक ! भूतनाथ बाबा पडलं नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २१ व्या शतकात असा माणूस सापडणे अवघड आहे, जो भुतांवर विश्वास करत असेल. मात्र झारखंडमधील जमशेदपुरमध्ये भूतनाथ बाबा नावाने प्रसिद्ध असलेला एक व्यक्ती २० वर्षांपासून भुतांना पकडून नागरिकांचे रक्षण करत आहे. या बाबाने केलेल्या दाव्यानुसार जमशेदपूरमधील जंगलात तो भुतांची पाहणी करून ज्या झाडावर भूत असेल त्या झाडाची प्रथम पूजा करतो आणि स्मशानातून आणलेल्या हाडकांनी मंत्राच्या साहाय्याने त्या भुताला आपल्या ताब्यात घेतो. यामुळे नागरिकांना त्रास होत नाही आणि भूतांपासून त्यांची सुटका होते.

याविषयी अधिक बोलताना भूतनाथ बाबांनी सांगितले कि, मागील २० वर्षांपासून ते हे काम करत आहेत. त्यासाठी ते दररोज जंगलात जाऊन ज्या झाडावर भूत असेल त्या झाडाची पूजा करतात. त्याच्या शक्तीने त्यांना कोणत्या झाडावर भूत आहे हे तात्काळ कळते. मंत्रांच्या मदतीने ते या भुतांना पकडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर भूत पकडल्यानंतर ते आनंद म्हणून ते त्याठिकाणी नाचतात देखील. त्यानंतर त्या भुताला पकडून ते घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्यानंतर त्या भुताची शक्ती कमी करून ते कुणाला त्रास देणार याची खात्री झाल्यानंतर ते त्याला पुन्हा जंगलात सोडून देतात.

दरम्यान, शहरी भागात जरी भुताच्या गोष्टींवर विश्वास ठेवला जात नसला तरी ग्रामीण भागात आजदेखील अशा अंधश्रद्धांवर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला जातो. या अंधश्रद्धांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिलांची हत्या केल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त