‘गुलाम’मधील अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमांचे देखील शूटिंग बंद होते असल्याने अनेक छोट्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशाच एका अभिनेत्यापैकी एक जावेद हैदर अभिनेत्यावर भाजीविक्री करण्याची वेळ आली आहे. हैदरने गुलाम, चांदनी बार या चित्रपटांमध्ये तर जिनी और जुजू सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. अभिनेत्री डॉली बिंद्राने जावेद हैदरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्रीने हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. भाजी विकताना देखील हा अभिनेता एका वेगळ्या शैलीमध्ये भाजी विकत आहे. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक तर होचच आहे. पण त्याची ही अवस्था झाल्याने सोशल मीडियावर अनेकांनी सहानुभूती देखील व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कलाकार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणार्‍यांना मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेकांनी या परिस्थितीपुढे हार मानली आहे. मात्र जावेद हैदरने भाजी विक्री करण्याचा निर्णय घेऊन आयुष्याशी संघर्ष सुरू ठेवल्याने त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.