Ghulam Nabi Azad | गुलाम नबी आझाद नव्या पक्षाची स्थापना करणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस (Congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार (Rajya Sabha MP) गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसोबतची पाच दशकांपासूनचे बंधन तोडले आणि आता ते त्यांच्या स्वतंत्र राजकीय मार्गावर सक्रिय होण्यास तयार आहेत. आझाद यांनी रविवारी जम्मूमधून त्यांच्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. आझाद यांची 4 सप्टेंबर रोजी सैनिक कॉलनीत जाहीर सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी वीस हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सांगितले होते की ते लवकरच नवीन पक्ष स्थापन करु. त्याचं पहिलं युनिट जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) असेल, असंही ते म्हणाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये आता निवडणुका होणार आहेत. गुलाम नबी आझाद यांचा नवा पक्ष हा भाजप (BJP) किंवा जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) किंवा पीडीपीसोबत (PDP) युती करु शकते. मात्र, भाजप सोबत युती करणार नाही, त्याचा ना मला ना त्यांना काही फायदा होईल, असं आझाद यांनी स्पष्ट केलं होतं.

 

माजी मंत्री जीएम सरोरी (Former Minister GM Sarori) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद यांचे रविवारी सकाळी दिल्लीहून आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत केला जाईल. तसेच त्यांच्यासोबत सैनिक कॉलनीतील सार्वजनिक सभेच्या ठिकाणी मिरवणूकही काढण्यात येईल. आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसमधून राजीनामा देणाऱ्या दोन डझनहून अधिक आमदारांमध्ये सरोरी यांचा समावेश आहे.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
आझाद यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री, 8 माजी मंत्री, 1 माजी खासदार, 9 आमदार,
पंचायत राज संस्थानचे मोठ्या संख्येने सदस्य, जम्मू-काश्मीरमधील नगरपरिषद आणि तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

 

Web Title :- Ghulam Nabi Azad | ghulam nabi azad public meeting in jammu today might be announce new party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Narottam Mishra | भाजप मंत्र्याचे धक्कादायक विधान; म्हणाले; ‘शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…’ (व्हिडीओ)

 

Pune Crime | ट्रॅफिक जाममुळे कारचालकाची PMPML बसचालकाला मारहाण; शिवीगाळ करणार्‍या कटके कुटुंबियांवर गुन्हा दाखल

 

Governor Appointed MLA | उध्दव ठाकरेंना धक्का ! राज्यपाल कोश्यारींकडून ‘महाविकास’च्या 12 आमदारांची यादी अखेर रद्द