Ghulam Nabi Azad | नवीन पक्ष स्थापन करणार का? गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टच सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ghulam Nabi Azad | काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस सुरु आहे. वेळोवेळी ती चव्हाट्यावर आली आहे. पंजाबमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) यांनी थेट नवीन पक्ष स्थापन केला. त्यातच प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांच्या राजीनामानाट्याने सुरु झाले ते संपते ना संपते तोपर्यंत आता जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीच्या संवादादरम्यान त्यांना नवीन पक्ष स्थापन करण्याबाबतच्या चर्चेवर आझाद यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी सध्या तरी नवीन पक्ष स्थापन करण्याचा विचार नाही पण, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असे म्हंटले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नंतर काँग्रेसला आणखी एका
मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

गुलाब नबी आझाद म्हणाले, काँग्रेस नेतृत्वाची टीका ऐकण्यासाठी आपण तयार नाही. इंदिरा गांधी यांच्या काळात युथ काँग्रेसमध्ये दोन महासचिव नियुक्त करण्यास नकार दिला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी किप इट अप असं म्हटलं. परंतु आज कोणालाही काही ऐकायचं नाही. जम्मू काश्मीरमधील काँग्रेस प्रमुखांना हटवण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्या मोहिमेचा आपण भाग नाही. येथील जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले जात आहे. जम्मू काश्मीरचे कलाम ३७० हटवले त्यानंतर राज्याच्या दर्जा काढून घेतला त्यामुळे इथे राजकीय कार्यक्रम ठप्प झाले आहेत, असंही त्यांनी सांगितले.

 

नेतृत्व आणि लोकांमधील संपर्क तुटला

५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आलं. त्यानंतर राजकीय कार्यक्रम ठप्प झाले.
हजारो लोकांना तुरुंगात पाठवले. जे बाहेर होते त्यांना कार्यक्रम घेण्यास परवानगी नव्हती.
दोन वर्षे नेतृत्त्व आणि लोकांमध्ये संपर्क तुटला आहे. मला एक मार्ग दिसला आणि त्या राजकीय मार्गावरून मी काम सुरु केलं.
आणि इतर पक्षहि तेच करत आहेत, असे आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांना काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस आहे आणि अनेक नेते राजीनामा देत आहेत, असा सवाल करण्यात आला.
यावर उत्तर देताना ते म्हणाले, आपल्यासाठी प्रत्येक व्यक्ती काँग्रेसी आहे.

जेव्हा मी जम्मू काश्मीरमध्ये राहतो तेव्हा आपण केवळ काँग्रेस पक्ष किंवा कोणत्या एका विशिष्ट लोकांबद्दल बोलत नसल्याचे आझाद म्हणाले.
आपण जम्मू काश्मीर काँग्रेस अध्यक्षांसह कोणत्या ही बैठकीत सामील झाले नाही हा केवळ योगायोग आहे का असा सवाल करण्यात आला.
त्यावर बोलताना आझाद म्हणाले की, काही लोकांना काम करायची सवय असते पण मला अधिक काम करायची सवय आहे.
आणि मी कासवगतीनं चालू शकत नाही, असे ते म्हणाले.

 

Web Title :- Ghulam Nabi Azad | when what will happen politics cannot be said ghulam nabi azad said question forming new party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Blind Men’s Association | ‘पुणे अंध जन मंडला’चा ‘पुणे प्रार्थना समाज – डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार 2021’ने गौरव

Women Safety Hub | अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका, महिलांच्या सुरक्षेसाठी Facebook ने आणलं ‘हे’ नवं फिचर

MLA Satish Chavan | शिक्षणशास्त्र विषय विद्यार्थ्यांनी अभ्यासावा- आमदार सतीष चव्हाण