टक्कल दूर करण्यासाठी अमरवेल प्रभावी, मजबूत आणि चमकदार होतील केस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्कर माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून सुरु झाली आहे. खानपान आणि जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या तरुणांमध्ये दिसून येते. टक्कल दूर करण्यासाठी अमरवेल प्रभावी असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. बाभूळ किंवा बोरांच्या झाडावर अमरवेल सामान्यपणे दिसून येतात. आयुर्वेदात अमरवेल खूप महत्तवाचे असल्याने त्याच्या फांद्या आणि बिया आयुर्वेदिक औषध म्हणून वापरल्या जातात. टक्कल पडण्यापासून ते केसांच्या समस्यांवर अमरवेल उपयुक्त आहे. याशिवाय याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात

टक्कल पडण्याची समस्या दूर करा

टक्कल दूर करण्यासाठी अमरवेलाचा औषध म्हणून उत्तम उपयोग होतो. टक्कल पडलं असेल तर अमरवेल बारीक वाटून तिळाच्या तेलात टाका आणि त्या तेलाचे नियमित डोक्याला मालिश करा. याने नवीन केस येण्यास सुरुवात होईल आणि केस गळणं कमी होईल. केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी 5 ग्रॅम अमरवेल बारीक करुन अर्धा लीटर पाण्यात उकळा आणि हे पाणी थंड झाल्यावर याने केस धुवा. ही प्रक्रिया प्रभावी ठरते.

डोळ्यांची सूज कमी होते

15 ते 20 मिली ग्राम अमरवेलच्या पानांच्या रसात थोडीशी साखर मिसळा आणि याचा लेप बनवून डोळ्यावर लावा. यामुळे डोळ्यावरील सूज दूर होईल आणि डोळ्यांचा लालसरपणा कमी होईल.

मधुमेहावर उपयुक्त

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे औषध अत्यंत फायदेशीर आहे. दररोज अमरवेलच्या बियांची 5 ग्रॅम पावडर सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज हे घ्यावे.

मेंदूच्या समस्या दूर होतील

ताणतणाव किंवा डोकेदुखी पासून मुक्त होण्यासाठी दररोज सकाळी 10 ते 20 ग्रॅम अमरवेलाची पावडर पाण्यात मिसळून या पाण्याचे सेवन केल्याने मेंदूशी संबंधित इतर समस्या दुर होतील.

योनीमार्गाच्या आजरांवर उपयुक्त

योनीमार्गाला होणारे रोग बरे करण्यास अमरवेल अतिशय प्रभावी आहे. योनीवर अमरवेलचा लेप लावल्याने योनीमार्गाचे आजार बरे होतात.

रक्त शुद्ध करते

रक्त शुद्धीकरणासाठी अमरवेल एक अतिशय प्रभावी औषध आहे. 4 ग्रॅम अमरवेलाची ताजी पानं गरम पाण्यात घालून काढा तयार करुन तो प्यायल्यास रक्त शुद्ध होतं. यामुळे आजारांना प्रतिबंध होतोच शिवाय त्वचाही सुंदर होते.

मूळव्याध दूर करण्यात प्रभावी

अमरवेलाचा उपयोग मूळव्याधेच्या समस्येवर मात करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. 10 ग्रॅम अमरवेलाच्या रसात काळी मिरी पूड मिसळा आणि संध्याकाळी नियमितपणे घ्या. मूळव्याध काही दिवसात बरा होईल आणि शरीराची इतर सूज देखील कमी होईल.

खाजेचे समस्या दूर करतं

अमरवेल खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. खाज सुटलेल्या जागेवर अमरवेलची पेस्ट लावल्यास खाज थांबते.

खास टीप – ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरीक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.