COVID-19 : Gilead नं ठरवली ‘रेमडेसिवीर’ औषधाची किंमत, 5 दिवसाच्या कोर्ससाठी करावा लागणार ‘एवढा’ खर्च, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गिलियड सायन्सेसने म्हटले की, ते अमेरिका सरकार आणि इतर विकसित देशांकडून कोरोना व्हायरस औषध रेमेडिसिवीरच्या एका कुपीसाठी 390 डॉलर आकारेल. त्यानुसार, उपचारांसाठी 5 दिवसांच्या संपूर्ण कोर्सची एकूण किंमत 2,340 डॉलर (सुमारे 1,75,500 रुपये) असेल. गिलियडने सोमवारी निवेदन प्रसिद्धी करून याबाबत माहिती दिली. कंपनीने म्हटले की, विकसित देशांसाठी वन प्राइस मॉडेलचा अवलंब केला जात आहे जेणेकरून प्रत्येक देशासाठी कोणताही सौदा होऊ नये.

गिलियडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल ओडे यांनी सांगितले की, “हे औषध रूग्णांपर्यंत पोहोचविण्यात कोणताही अडथळा येऊ नये, अशी आमची इच्छा आहे.. ही किंमत जगातील सर्व देशांमधील रूग्णांपर्यंत औषध पोहोचू शकते, हे सुनिश्चित करेल. 390 डॉलर प्रती शिशीची किंमत सर्व सरकारी घटकांसाठी असेल. एकदा पुरवठ्यावरील दबाव कमी झाल्यावर हे औषध सामान्य डिस्ट्रीब्युशन चॅनलद्वारे विकले जाईल. इतर खाजगी विमा कंपन्या आणि कॉमर्शियल प्लेयर्ससाठी ही शीशी 520 डॉलर असेल, म्हणजेच 5 दिवसांच्या पूर्ण कोर्ससाठी 3,120 रुपये असेल.

जलद रिकव्हरसाठी मदत करते रेमेडिसिवीर
दरम्यान, कोविड -19 च्या उपचारासाठी रेमेडिसिवीरचा वापर सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतल्यानंतर, परिणामांवरून असे दिसून आले की, रेमेडिसिवीर वापरणार्‍या रुग्णांची रिकव्हरी वेगवान झाली आहे. या निकालांच्या आधारे, यूएस ड्रग रेग्युलेटरने मे महिन्यात रेमेडिसिवीरच्या वापरास मान्यता दिली होती. याव्यतिरिक्त, जगभरातील शेकडो संस्था कोरोना विषाणूवरील उपचार आणि लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातील बहुतेक चाचणी टप्प्यात आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 1 कोटीहूनही अधिक लोक कोरोना विषाणूमुळे बाधित झाले असून सुमारे 5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

गिलियडने म्हटले होते की, जून महिन्यात ते रेमेडिसिवीर डोनेट करतील. पण त्यादरम्यान सर्वात मोठा प्रश्न होता की कंपनी या नंतर काय निर्णय घेईल. गिलियड सायन्सेसच्या या औषधाच्या किंमतीवरही सर्वांचे लक्ष आहे, कारण भविष्यात इतर कोविड -19 औषधांच्या किंमतीदेखील याच आधारावर निश्चित केल्या जातील. तसेच या औषधाच्या किंमतीच्या आधारे ही ते अधिक शुल्क आकारेल , असे कंपनीने म्हटले आहे. परंतु, इतर सर्व विकसीत देशांना ते खरेदी करता यावेत यासाठी कंपनीने कमी किंमत ठेवली आहे.

काही अंदाजांत दावा केला आहे की, एका ट्रीटमेंट कोर्ससाठी रेमेडिसिवीरचा खर्च जवळपास 4,500 डॉलर पर्यंत असू शकतो. त्याच वेळी, इतर काही अंदाजात म्हंटले आहे कि, कंपनीने दररोज केवळ 1 डॉलर शुल्क आकारले पाहिजे. दिवसाच्या 1 डॉलर शुल्कावरून युक्तिवाद केला जात आहे कि, याला सर्वसामान्य औषध उत्पादक मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतील. दरम्यान, ओ डे यांनी सांगितले की, ही वाजवी किंमत नाही. रुग्णाच्या 5 दिवसांच्या कोर्समध्ये रेमेडसवीरच्या 6 कुपी वापरल्या जातात. काही प्रकरणांमध्ये, हे 10 दिवस किंवा 11 कुपी देखील वापरल्या जातात. त्याची एकूण किंमत 4,290 डॉलर होते.

अडीच लाख उपचार कोर्स दान
आतापर्यंत, गिलियडने जवळजवळ अडीच लाख उपचारांच्या कोर्ससाठी रेमेडिसिवीरचे डोनेशन केले आहे. कंपनी सतत आपला पुरवठा वाढविण्यावर काम करत आहे. या वर्षाच्या अखेरीस, कंपनी सुमारे 20 लाख उपचार कोर्स तयार करणार आहे. ओ’डे म्हणाले की, या औषधाची किंमत निश्चित करणे हे एक संतुलित कृत्य आहे. एकीकडे, सध्याचा साथीचा रोग निरंतर वाढत आहेत आणि यावर कोणताही उपचार नाही. दुसरीकडे, आमची कंपनी नफा मिळवणारी संस्था आहे, ज्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.