Coronavirus : ‘कोरोना’च्या या औषधा संदर्भात आली चांगली बातमी, रूग्णांवर होतोय ‘प्रभावी’ उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या लसीसंदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. इबोला निर्मूलनासाठी बनवलेले औषध कोरोना विषाणूच्या रूग्णांना लवकरात लवकर बरे करत आहे. गिलियड सायन्सेस इन्कॉर्पोरेशनचे रेमेडीसीव्हीर औषध अशा रुग्णांना बरे करीत आहे, जे कोरोना व्हायरसमुळे गंभीर आजारी नाहीत. कोरोनाच्या रूग्णांवर औषध तपासणीसाठी कंपनीने 600 रूग्णांना दोन प्रकारच्या ट्रीटमेंटवर ठेवले. काही लोकांना औषध 5 दिवस दिले गेले. काही रुग्णांना 10 दिवसांचा औषधोपचार देण्यात आला. या रुग्णांबरोबरच मानक औषधी प्रक्रियेद्वारे उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही ठेवले होते. अकराव्या दिवशी आढळून आले की, पाच दिवसांचा उपचार घेणारे रूग्ण नेहमीच्या पद्धतीने उपचार केल्या जाणाऱ्या रूग्णांपेक्षा लवकर बरे होतात. तसेच, गंभीर रुग्ण ज्यांना 10 दिवस औषध दिले गेले होते, त्यांच्यातही बरीच सुधारणा दिसून आली.

महिनाभरापूर्वी अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की, या औषधाच्या यशामुळे आम्हाला कोरोनाला पराभूत करण्याची नवी आशा मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉ अँथनी फॉसी यांनीही या औषधाचे कौतुक केले आहे. या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण 31 टक्के वेगाने बरे होत आहेत. डॉ. फॉसी म्हणाले की, ते खरोखर जादूचे औषध आहे. यामुळे, रूग्ण तेजीने बरे होत आहे, म्हणजेच आम्ही हे औषध अधिकाधिक वापरु शकतो. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्पसमोर डॉ. फॉसी यांनी माध्यमांना याबाबत सांगितले.

अमेरिकेने एप्रिल महिन्यात या औषधाची क्लिनिकल चाचणी सुरू केली. ज्याचे निकाल आता समोर आले आहेत. डॉ. फोसे म्हणाले की, आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की, रुग्णांच्या रिकव्हर होण्याची वेळेवर रेमेडिसिव्हिर औषधाचा अतिशय स्पष्ट, प्रभावी आणि सकारात्मक प्रभाव पडतो. अमेरिका, युरोप आणि आशियातील 68 ठिकाणी 1063 लोकांवर औषधोपचार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्यामध्ये नोंदवले गेले आहे की, हे औषध कोरोना रूग्णांना त्वरेने बरे करू शकते, तसेच व्हायरस जलद थांबवू शकतो.

दरम्यान, रेमेडिसिवीर इबोला चाचणीत अयशस्वी ठरली होती. यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, कोरोना रूग्णांवर या औषधाचा परिणाम कमी होत आहे. ते प्रभावी नाही. परंतु आता या क्लिनिकल चाचणीनंतर डब्ल्यूएचओचे वरिष्ठ अधिकारी मायकेल रायन भाष्य करण्यास नकार देत आहेत. इबोलाची लस म्हणून रेमेडिसिवीर औषध तयार केले होते. असा विश्वास आहे की, यामुळे कोणत्याही प्रकारचे विषाणू ठार होऊ शकतात. यापूर्वी, अमेरिकेतील शिकागो शहरात गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या 125 रुग्णांना रेमेडिसिवीर देण्यात आले होते, त्यापैकी 123 लोक बरे झाले.

कोरोना विषाणूविरूद्ध सर्वात प्रभावी मानले जाणारे हे रेमेडिसिवीर औषध, जेव्हा चीनमध्ये सर्वात आधी मनुष्यांमध्ये पसरण्याची पुष्टी झाली तेव्हाच त्याने पेटंट करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव अयशस्वी ठरला.