ब्लड शुगरच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं ‘गुळवेल’चे सेवन, वेगाने ब्लड शुगर लेव्हल होईल कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर चेहरा, मान आणि शरीराच्या इतर भागावर ब्लॅक स्पॉट पडले तर समजा की हे शुगर लेव्हलचे संकेत आहेत. शुगर लेव्हल वाढल्याचे ते सांगतात. शरीराचे हे संकेत ओळखता आले पाहिजेत. परंतु आपण अशा संकेतांकडे दुर्लक्ष करतो. ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी गुळवेलचे सेवन करू शकता. यामुळे ब्लड शुगर वेगाने नियंत्रित होते.

डायबिटीजची लक्षणे
* जास्त तहान लागणे
* वारंवार लघवीला होणे
* नेहमी थकवा जाणवणे
* वजन वाढणे-कमी होणे
* तोंड सुकणे

काय आहे गुळवेलमध्ये…
* गिलोईन नावाचे ग्लुकोसाईड आणि टीनोस्पोरिन
* पामेरीन आणि टीनोस्पोरिक अ‍ॅसिड
* कॉपर, आयर्न, फॉस्फरस, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम
* अँटी ऑक्सीडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी
* अँटी-कॅन्सर तत्व
* यातील हायपोग्लायकॅमिक ब्लड शगर कंट्रोल करते.

असे करा गुळवेलचे सेवन
जर एखाद्या व्यतीला डायबिटीज असेल तर त्याने रोज गुळवेलच्या ज्यूसचे सेवन करावे. जर तुम्हाला गुळवेलची वेल कुठे मिळाली तर ती चांगल्या प्रकारे धुवून घ्या. नंतर गरम पाण्यात चांगल्या प्रकारे उकळवा. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. आता रोज एक ग्लास गुळवेल ज्यूस पिऊ शकता.