सुंठ पावडरच्या सेवनानं ‘या’ शारीरिक तक्रारी होतात दूर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सुंठ पावडर चवीला खूप तीक्ष्ण असते हे सर्वांनाच माहित आहे. याच्या सेवनानं आपल्या शरीराला खूप फायदे होतात. अनेकदा चहा किंवा दुधासोबतही याचं सेवन केलं जातं. आज आपण याच्या सेवनानं शरीराल कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

सुंठीच्या सेवनाचे फायदे –
1) भूक वाढण्यास याची खूप मदत होते.

2) अ‍ॅसिडिटी दूर होते.

3) अपचन, मळमळ अशा काही तक्रारी असतील तर त्यापासून सुटका मिळते.

4) पोटदुखीची तक्रार असेल तर तीही यानं दूर होते.

5) पोटात गॅस होणं, पोट जडणं अशा तक्रारी असतील तर त्यी दूर होतात.

6) सुंठीमुळं पित्त होत नाही. चवीला तिखट असणारी सुट्ट आम्लपित्तनाशक आहे.

7) खोकला, सर्दी अशा समस्या असेल तर दूर होतात.

घरीच बनवा सुंठ पावडर
आलं दुधात भिजवून उन्हात सुकवलं तर सुंठ तयार होते. ही सुंठ मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पूड करून घेतली तर घरच्या घरीच सुंठ पावडर तयार करता येते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.