घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फास्टफूडच्या जमान्यात आपले आपल्या खाण्यावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे वजनही खूप वाढते आहे. या वाढत्या वजनामुळे अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वजनावर नियंत्रण आण्यासाठी आपण अनेक पद्धती आजमावतो. वेगवेगळ्या गोळ्या घेतो. त्यामुळे थोडेफार वजन कमी झाले तरी आपल्या आरोग्यावर त्या गोळ्या खूप वाईट परिणाम करतात. आणि वाढत्या वजनाबरोबरच वजन कमी करण्याच्या गोळ्यामुळे एखाद्या नवीन आजाराला आमंत्रण मिळते. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम करणाऱ्या गोळ्या घेऊन वजन कमी करण्यापेक्षा घरगुती पद्धतीने वजन कमी केले तर ते फायद्याचे ठरेल.

घरगुती पद्धतीने वजन कमी करण्याच्या टिप्स
१) आद्रक हे वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचे आहे. कारण आद्रक खाल्याने आपल्याला भूक लागत नाही. आणि कमी प्रमाणात जेवण केल्यामुळे आपलं वजन कमी होत.

२) आपण आद्रकचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करू शकतो. वजन कमी करण्यासाठी जर आद्रकच पाणी पील. तर झटपट वजन कमी करण्यास मदत होते.

३) लिंबू आणि आद्रकचा रस पिल्यावर पोटातील चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. अद्रकचा चहा करून त्यात लिंबू टाका आणि ते प्या याने झटपट वजन कमी होईल. आणि यामुळे आरोग्यावर काही विपरीत परिणाम होणार नाहीत.

४) तुम्ही ऍपल सिडर वेनेगर आद्रकमध्ये टाकून पिलात तर यामुळेही वजन लवकर कमी होईल. त्यामुळे आद्रक हे विविध आजारावर गुणकारी तर आहेच पण यामुळे वजन कमी होण्यासही खूप मदत होते.