फक्त 2 मिनिटे केसांना लावा आले, केस गळणे कमी होईल, जाणून घ्या पध्दत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केस गळणे, कोरडेपणा आणि कोंडा होणे यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. हे टाळण्यासाठी, केसांना संपूर्ण पोषण मिळणे आणि मुळे मजबूत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. केस लांब, जाड आणि रेशमी बनविण्यासाठी मुली अनेक उपाय करतात आणि केसांची निगा राखणारी उत्पादने वापरतात; परंतु त्यांनी काहीही फरक पडत नाही. परंतु, एक उपाय करून आपण केस गळती रोखू शकता केस रेशमी, मऊ, दाट आणि चमकदार बनतील जाणून घ्या उपाय…

आपण केसांचा मास्क लावू शकता हा मास्क आपण फक्त २ मिनिटांत तयार करू शकता.
केसांचा मास्क कसा बनवायचा
१) आल्याचा रस – १ चमचा
२) नारळ तेल – २ चमचे
३) एरंडेल तेल – २ चमचे

मास्क कसा बनवायचा
१) यासाठी प्रथम नारळाचे तेल कमी गॅसवर गरम करावे. त्याचप्रमाणे एरंडेल तेल गरम करा.
२) आता आल्याचा रस दोन्ही तेलात मिसळा; परंतु लक्षात ठेवा की ते थेट तेलात टाकू नका.
३) प्रथम एका भांड्यात एरंडेल तेल आणि त्यात आल्याचा रस मिसळा आणि नंतर हे दोन्ही नारळ तेलात मिसळा.

मास्क लावण्याची पद्धत
यासाठी हलक्या हातांनी टाळूवर मास्क लावा आणि नंतर बोटांच्या मदतीने गोलाकार हालचालीमध्ये हळूवारपणे मालिश करा. २ तास तसेच सोडा आणि नंतर पाणी आणि सौम्य शाम्पूने केस धुवा. केस धुल्यानंतर कंडिशनर लावण्यास विसरू नका.

आपण कितीदा मास्क लावू शकता ?
आठवड्यातून किमान २ वेळा हा मास्क वापरू शकता. लक्षात ठेवा आपण किमान १ महिन्यासाठी नियमितपणे लावल्यास आपल्याला फायदा मिळेल.

आल्याच्या मास्कचे फायदे
मुळांपासून केसांना पोषण मिळते, ज्यामुळे त्यांची वाढ वाढते. तसेच हे केस गळणे देखील कमी करते. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण आणि ऑक्सिजन प्रवाह वाढतो. त्यात उपस्थित अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म केसांचा कोंडा, कोरडेपणापासून आराम मिळतो.