Ginger Tea | जर तुम्ही सुद्धा हिवाळ्यात पित असाल आल्याचा चहा तर व्हा सावध, ‘या’ गंभीर आजारांना बळी पडू शकता!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आल्याचा चहा (Ginger Tea) बहुतांश लोकांना प्यायला आवडतो. हिवाळ्यात प्रत्येकजण याची मागणी करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, आल्याचा चहा (Ginger Tea) खुप जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी हानिकारक होऊ शकते. इतके की तुम्ही आजारी पडू शकता.

 

मग हा चहा आल्या ऐवजी वेलचीचा असला तरी जास्त सेवन केल्यास हानिकारक ठरतो. परंतु आल्याचा चहा आवडत असेल तर याचे फायदे आणि तोटे दोन्ही माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही संपूर्ण दिवसात केवळ पाच ग्रॅम आले सेवन करू शकता. यापेक्षा जास्त सेवन केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात.

 

जास्तप्रमाणात आल्याचा चहा पिण्याने होणारे नुकसान

1. जास्त आल्याचा चहा सेवन केल्याने ब्लड शुगरचा स्तर कमी होऊ शकतो.

2. पोटात जळजळीची समस्या सुद्धा होऊ शकते.

3. निद्रानाशाची समस्या होऊ शकते.

4. अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

5. पोटात गॅस तयार होतो.

6. ज्यांचा बीपी कमी आहे त्यांच्यासाठी आल्याचा चहा अतिशय हानिकारक ठरतो. कारण आल्यात रक्त पातळ करण्याचा गुण असतो, यामुळे बीपी कमी होतो.

 

हे लक्षात ठेवा

खुप जास्त प्रमाणात आले सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल कमी होते. शुगरच्या रुग्णांनी हे टाळले पाहिजे.

याच्या सेवनाने ब्लड शुगर अचानक कमी होऊ शकते.

ज्यामुळे हायपो ग्लायसीमियाची स्थिती निर्माण होऊ शकते.

आल्याचा चहा (Ginger Tea) पित असाल तर एक कप चहात एक चतुर्थांश चमचा आले भरपूर होते.

 

Web Title :- Ginger Tea | if you also do drinking ginger tea in winter then be careful these serious diseases can be a victim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Narayan Rane | ‘राज्यामधील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अन्….’, नारायण राणेंनी जाहीर केली तारीख

Multibagger Penny Stock | रु. 1.85 चा शेयर 97 रुपयांचा झाला, दिड वर्षात 1 लाखाचे झाले 52 लाख, दिला 5150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का?

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध