‘वायू’ चक्रीवादळ : सोमनाथ मंदिराच्या 155 फूट उंच शिखरापर्यंत उसळल्या समुद्राच्या लाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायू चक्रीवादळ शांत होण्याचे नाव घेत नाही, आता तर या भयानक वादळाने गुजरातमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर यांचा परिणाम झाल्याचे पाहयला मिळते आहे, या वादळाने मोठे नुकसान केले आहे.

जगभरातील हिंदूची श्रद्धास्थान असलेले, सोमनाथ मंदिर आता या वादळाच्या कावेत आले आहे. वादळाच्या कारणाने 155 फूट उंच मंदिराच्या शिखरापर्यंत समुद्राच्या लाटा उचल खाताना दिसत आहे. यामुळेच मंदिराच्या प्रवेशद्वाराचे देखील नुकसान झाले आहे.

सोमनाथ मंदिरावर वायूचा परिणाम –
गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर चक्रीवादळाचा परिणाम होताना दिसत आहे. येथे समुद्राच्या बऱ्याच उंच लाटा उचल खात आहेत, यामुळेच मंदिरात आत जाताना लागणाऱ्या प्रवेशद्वाराचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांनी सांगितले की चक्रीवादळची भयानक परिस्थिती पाहता येथे देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असले तरी मंदिर उघडे ठेवण्यात आले आहे.

मंदिर उघडे पण पर्यटकांना बंदी –
असे असले तरी येथे पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आले आहे, हे यासाठी करण्यात आले असेल तरी येथे अनेक वर्षांपासून कायम आरती करण्यात येते, या नियमाला मंदिर व्यवस्थापन भंग करु शकत नाही. त्यामुळे येथे मंदिर उघडे ठेवण्यात आले असेल तरी पर्यटकांना मंदिरात येण्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे.

मोदी, अमित शाह परिस्थितीवर लक्ष ठेवून –
मंदिरातील स्थिती नियंत्रणात आहे, तसेच येथील परिस्थिति बाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दिल्लीतून लक्ष ठेवून आहेत. अमित शाह या सोमनाथ मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !

सावधान ! पुण्यात टीबीच्या (एक्सडीआर) रूग्णांची संख्या वाढतेय

अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हा’ पदार्थ ; उजळेल सौंदर्य

Loading...
You might also like