गोरेगावमध्ये पुलाचे काम सुरु असताना क्रेन कोसळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
मुंबईतल्या गोरेगाव येथे पुलाच्या बांधकामा दरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळली. ही घटना एसव्ही रस्त्यावर घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली.

एसव्ही रस्त्यावर शनिवारी रात्री पुलाचे काम सुरु होते. पुलाच्या बांधकामा दरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळले. आज सकाळपासून गोरेगाव इथला एमटीएनएल चौक वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. तर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.ही क्रेन सध्या हटवण्याचे काम सुरु असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी चार ते पाच तास लागतील असे मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर सांगितले.

गोरेगावमध्ये पुलाचे काम सुरु असताना क्रेन कोसळली