ज्येष्ठ उद्योजक व क्रीडा प्रेमी गिरीराजसिंह चुडासामा यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्येष्ठ उद्योजक व क्रीडा प्रेमी गिरीराजसिंह मानसिंह चुडासामा (वय 84 वर्ष) यांचे हृदय विकाराने आज निधन झाले. ते अनेक वर्ष पूना क्लबच्या कमिटीवर ही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

मुंबईचे माजी शरीफ नाना चुडासामा हे त्यांचे बंधू होत. तर भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते काका होते. त्यांचा मुलगा कश्यपसिंह चुडासामा ऑलिंपिक संघावर पीआरओ होते व रेल्वे कमिटी आणि टेलिफोन कमिटीवर माजी सदस्य होते. त्यांच्यावर 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी केले जातील.

You might also like