home page top 1

‘या’ भाजपच्या नेत्याने ममता ‘दीदीं’ची तुलना केली हुकूमशहा ‘किम जोंग ऊन’ शी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जोंग ऊन’ यांच्याशी केली आहे. गिरीरराज यांनी म्हंटले की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये किम जोंग यांची भूमिका बजावत आहेत. ममता बॅनर्जी हक्कांसाठी उठणाऱ्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता त्यांच्या राज्यात विजयी यात्रा काढण्याची परवानगी देत नाहीत.

ममता बॅनर्जी यांनी विजयी यात्रा काढण्यापासून भाजपला रोखले होते.

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी बंगालमध्ये भाजपला विजयी यात्रा काढण्याची परवानगी नाकारली होती. ममता बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, भाजप विजयी यात्रेच्या नावाखाली हिंसाचार पसरवत आहे. त्यांनी म्हंटले की, राज्याच्या अनेक जिल्ह्यातून भाजपच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. विजयी यात्रेच्या नावाखाली हिंसाचार पसरवला जात असल्याचे या तक्रारीत सांगण्यात आले.

ममतांचा उलटा प्रवास सुरु – गिरिराजसिंह

गिरीरराजसिंह यांनी ममतांवर आरोप करताना म्हंटले की, ममता बॅनर्जी सरकार भारतीय संविधानावर विश्वास ठेवत नाही. ममता सातत्याने संविधानाचे उल्लंघन करत आली आहे. ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान मानत नाही. ममता बॅनर्जी या लोकशाही व्यवस्थेत राहू इच्छित नाही. आता जनताच त्यांना योग्य जागा दाखवून देईल. ममतांचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. जनतेला फक्त विकास पाहिजे.

Loading...
You might also like